अ‍ॅपशहर

पांडे यांचे व्याख्यान

कॅलिडोस्कोपशनिवार, २५ ऑगस्टजीविधातर्फे निसर्ग कट्ट्यात आज (दि २५) 'चिमणीचे संवर्धन' या विषयावर डॉ सतीश पांडे यांचे व्याख्यान होणार आहे...

Maharashtra Times 25 Aug 2018, 4:00 am

कॅलिडोस्कोप

शनिवार, २५ ऑगस्ट

जीविधातर्फे निसर्ग कट्ट्यात आज (दि. २५) 'चिमणीचे संवर्धन' या विषयावर डॉ. सतीश पांडे यांचे व्याख्यान होणार आहे. तुळशीबागवाले कॉलनी येथील जनता सहकारी बँकेच्या वर मधुमालती सभागृह येथे सायंकाळी ६ वाजता हे व्याख्यान होणार आहे.

मधुमालती सभागृह : सायं. ६

काव्यमैफलीचे आयोजन

बुकमार्क पब्लिकेशन्सतर्फे काव्यसंग्रहाचे प्रकाशन आणि काव्यमैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीनिवास गुजर, शोभा तेलंग यांच्या उपस्थितीत कोथरूड येथील गांधी भवनमधील महात्मा गांधी सभागृह येथे सायंकाळी ६ वाजता ही मैफल होणार आहे.

गांधी भवन : सायं. ६

सफारीविषयी कार्यक्रम

'सिक्कीम ते लेह अद्भूत सफारी' या विषयावर वसंत लिमये यांचे व्याख्यान अभ्यास मंडळातर्फे आयोजिण्यात आले आहे. जुन्या कर्नाटक हायस्कूलजवळील श्री ठाकूरधाम भारती निवास कॉलनी येथे सायंकाळी सात वाजता हा कार्यक्रम होईल.

भारती निवास कॉलनी : सायं. ७

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज