अ‍ॅपशहर

पेशंटचा मृत्यू - मुस्तफा

कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमध्येतरुणीचा मृत्यूम टा...

Maharashtra Times 19 Jul 2018, 4:00 am

कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमध्ये

तरुणीचा मृत्यू

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे कॅन्टोन्मेंन्ट बोर्डाच्या सरदार वल्लभभाई पटेल हॉस्पिटलमध्ये एका १८ वर्षाच्या तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. आसिया ताहीर सय्यद (रा. खोली क्र. १७, दहा नंबर कॉलनी, कासेवाडी) असे मृत तरुणीचे नाव आहे. हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे तरुणीचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या नातेवाइकांनी केला असून, तरुणीच्या वडिलांनी लष्कर पोलिसांकडे तक्रार दिली आहे.

या तरुणीवर कोंढवा येथील स्थानिक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. तिचा त्रास वाढल्याने तिला कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तिची तपासणी करून डॉक्टरांनी तिला घरी पाठविले. परंतु, बुधवारी सकाळी तिला पुन्हा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. उपचार सुरु असतानाच तिच्या प्लेटलेट्स कमी झाल्या. परंतु, निवासी वैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे तिला योग्य उपचार मिळाले नसल्याची तक्रार तिच्या नातेवाइकांनी केली आहे.

दरम्यान, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्याधर गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता, संबंधित पेशंटवर उपचार केले असल्याचे त्यांनी सांगितले. तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण समजू शकेल.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज