अ‍ॅपशहर

सुरक्षित क्रॉसिंगपासून पादचारी दूरच

पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी पालिकेने आखलेले पादचारी धोरण आठ महिन्यांनंतरही कागदावरच असल्याचे चित्र आहे. गर्दीच्या रस्त्यावर दर दीडशे ते दोनशे मीटर अंतरावर पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी सुरक्षित मार्ग (क्रॉसिंग) उपलब्ध करून देण्याची तरतूद धोरणात आहे. मात्र, शहरातील अनेक महत्त्वाच्या आणि मोठ्या रस्त्यांवर क्रॉसिंग अस्तित्वातच नसल्याचे आढळून आले आहे. पादचारी धोरण करणारी पहिली पालिका म्हणून मिरविणाऱ्या स्मार्ट सिटीत पादचारी कायम असुरक्षित असल्याची वस्तुस्थिती आहे.

Maharashtra Times 19 Apr 2017, 4:11 am
धोरण आठ महिन्यांनंतरही कागदावरच; मोठ्या रस्त्यांवरही क्रॉसिंगचा अभाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pedestrians too long from safe crossing
सुरक्षित क्रॉसिंगपासून पादचारी दूरच


म. टा. प्रतिनिधी, पुणे

पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी पालिकेने आखलेले पादचारी धोरण आठ महिन्यांनंतरही कागदावरच असल्याचे चित्र आहे. गर्दीच्या रस्त्यावर दर दीडशे ते दोनशे मीटर अंतरावर पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी सुरक्षित मार्ग (क्रॉसिंग) उपलब्ध करून देण्याची तरतूद धोरणात आहे. मात्र, शहरातील अनेक महत्त्वाच्या आणि मोठ्या रस्त्यांवर क्रॉसिंग अस्तित्वातच नसल्याचे आढळून आले आहे. पादचारी धोरण करणारी पहिली पालिका म्हणून मिरविणाऱ्या स्मार्ट सिटीत पादचारी कायम असुरक्षित असल्याची वस्तुस्थिती आहे.
‘पादचारी प्रथम’ या संघटना पादचाऱ्यांच्या हक्कांसाठी तसेच, रस्त्यावर चालताना त्यांना सुरक्षित वातावरण मिळवून देण्यासाठी गेल्या आठ वर्षांपासून पाठपुरावा करीत आहे. मात्र, तत्कालीन प्रशासकांनी त्यांच्या प्रयत्नांकडे ढुंकूनही पाहिले नाही. विद्यमान पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी त्यांच्या प्रस्तावावर सकारात्मक विचार करून पादचारी धोरण निश्चित करण्यासाठी समिती स्थापन केली. या समितीने ‘पादचारी प्रथम’ने तयार केलेले धोरणच योग्य असल्याची शिफारस आयुक्तांना केली. त्यानंतर पालिकेच्या सर्वसाधारण सभेनेही २४ ऑगस्ट २०१६ ला त्यास मंजुरी दिली. मात्र, त्यानंतर पादचारी धोरण केवळ स्मार्ट सिटीच्या ‘पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन’मध्ये राहिले. पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी या धोरणात विविध उपाययोजनांची तरतूद आहे. मात्र, पदपथांच्या सुशोभिकरणाव्यतिरिक्त अन्य उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी झालेली नाही.
शहरात पादचारी धोरणाबरोबरच ‘अर्बन स्ट्रीट गाइडलाइन्स’ तयार करण्यात आल्या आहेत. त्यानुसार जंगली महाराज रस्त्याची रचना करण्यात येत असून, ते काम प्रगतिपथावर आहे. यामध्ये जंगली महाराज रस्त्यावर पादचाऱ्यांना चालण्यासाठी मुबलक जागा उपलब्ध होणार आहे. मात्र, पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी सुरक्षित उपाययोजना करण्यात आलेली नाही. टिळक रस्ता, गोखले रस्ता येथे पदपथांचे सुशोभिकरण करण्यात आले आहे. प्रत्यक्षात पादचारी धोरणात क्रॉसिंगबाबत एकूण २१ तरतुदी आहेत. मात्र, त्यातील बहुतांश तरतुदींचा पालिका प्रशासनाला विसर पडल्याचे दिसून आले आहे.

धोरणातील महत्त्वाच्या तरतुदी
- पादचारी क्रॉसिंग सुरक्षित आ​णि सोयीस्कर ठिकाणी असावे. रस्ता ओलांडण्याचे अंतर कमी असावे. मोठ्या रस्त्यांवर क्रॉसिंगच्या मधोमध पादचाऱ्यांना थांबता येईल, असे बेट असावे.
- पादचारी क्रॉसिंगच्या अलिकडे स्पष्ट दिसेल असे झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे आणि वाहनांनी थांबणे अपेक्षित आहे, त्या ठिकाणी स्टॉप लाइन हवी.
- स्टॉप लाइन आणि झेब्रा क्रॉसिंगमध्ये किमान दोन मीटर अंतर पाहिजे.
- पादचारी क्रॉसिंगला वाहतूक नियंत्रण सिग्नल हवा. सिग्नल सर्वांना दिसतील अशा ठिकाणी आवश्यक.
- वाहनचालकांना पादचारी क्रॉसिंगबाबतची माहिती देणारे फलक ठरावीक अंतरावर लावावेत.

बाणेर रस्त्यासारख्या मोठ्या रस्त्यांवर पादचाऱ्यांसाठी सुरक्षित क्रॉसिंग असते, तर निष्पाप जिवांचा बळी गेला नसता. रस्त्याला पुरेसा दुभाजक असणे, पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी सुरक्षित क्रॉसिंग असणे ही प्राथमिक गरज आहे. या सुविधा बहुतांश रस्त्यावर पाहायला मिळत नाहीत.
प्रशांत इनामदार, अध्यक्ष, पादचारी प्रमुख

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज