अ‍ॅपशहर

कोचिंग क्लासच्या 'त्या' निर्दयी शिक्षिकेला अटक

अवघ्या अडीच वर्षाच्या चिमुरड्याला डोळे सुजेपर्यंत बेदम मारहाण करणाऱ्या पिंपरी चिंचवडमधील निर्दयी शिक्षिकेला आज अखेर पोलिसांनी अटक केली आहे. भाग्यश्री पिल्ले असं या निर्दयी शिक्षिकेचे नाव आहे.

Maharashtra Times 15 Sep 2017, 3:02 am
म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pimpari chichwad coaching class teacher arrested
कोचिंग क्लासच्या 'त्या' निर्दयी शिक्षिकेला अटक


अवघ्या अडीच वर्षाच्या चिमुरड्याला डोळे सुजेपर्यंत बेदम मारहाण करणाऱ्या पिंपरी चिंचवडमधील निर्दयी शिक्षिकेला आज अखेर पोलिसांनी अटक केली आहे. भाग्यश्री पिल्ले असं या निर्दयी शिक्षिकेचे नाव असून तिनं अडीच वर्षाच्या देव कश्यप या चिमुरड्याला दोन्ही डोळे सुजेपर्यंत बेदम मारहाण केली होती. अखेर आज सांगवी पोलिसांनी तिच्यावर कारवाई करीत तिला अटक केली आहे.

पिंपळे गुरवमध्ये चार दिवसांपूर्वी देव कश्यप या मुलाला ट्युशन शिकवणाऱ्या भाग्यश्री पिल्ले हिनं अमानुष मारहाण केली होती. वर्गात लाकडी पट्टीने या मुलाच्या डोक्यात, हातावर आणि पाठीवर जोरात मारहाण केली. निर्दयीपणे मारहाण केल्याने मुलाचे डोळे सुजले आहेत. शिक्षिकेने बेदम मारहाण केल्याचे पाहून देव कश्यपच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त करीत तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनची धाव घेतली. परंतु पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप देवच्या नातेवाईकांनी केला.

देवचे सुजलेले डोळे पाहूनच शिक्षिकेने केलेली मारहाण किती अमानुष होती, याची कल्पना येते. पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये मुलावर उपचार करून त्याला घरी सोडले. अद्यापही त्याच्या चेहऱ्यावर व अंगावर मोठ्या प्रमाणात सूज आहे. दरम्यान, अखेर बुधवारी रात्री पोलिसांनी शिक्षिकेविरोधात बाल संरक्षक कायद्याअंतर्गत बालकांना क्रुरतेने वागणूक देणे, जाणीवपूर्वक मारहाण करणे प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला व तिला आज अटक केली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज