अ‍ॅपशहर

पिंपरीत भरदिवसा गुन्हेगारावर गोळीबार

चहा पिण्यासाठी आलेल्या संतोष कुरावत (३३, रा. काळेवाडी) या सराईतावर पिंपरी कॅम्पात भरदिवसात गोळीबार करण्यात आला. याला प्रतिकार म्हणून गुन्हेगाराने व त्याच्या मित्रांनी हल्लेखोरांवर चहाची किटली, बादली, पाण्याचे जग फेकून मारले. त्यामुळे हल्लेखोर पसार झाले. तर त्याच्या मित्रांना संतोषला खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. भरदुपारी सव्वा तीनच्या सुमारास हा प्रकार घडल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

Maharashtra Times 16 Sep 2017, 3:00 am
पिंपरी : चहा पिण्यासाठी आलेल्या संतोष कुरावत (३३, रा. काळेवाडी) या सराईतावर पिंपरी कॅम्पात भरदिवसात गोळीबार करण्यात आला. याला प्रतिकार म्हणून गुन्हेगाराने व त्याच्या मित्रांनी हल्लेखोरांवर चहाची किटली, बादली, पाण्याचे जग फेकून मारले. त्यामुळे हल्लेखोर पसार झाले. तर त्याच्या मित्रांना संतोषला खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. भरदुपारी सव्वा तीनच्या सुमारास हा प्रकार घडल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pimpri firing
पिंपरीत भरदिवसा गुन्हेगारावर गोळीबार


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष हा अमोल घुले यांच्या खून प्रकरणातील आरोपी आहे. संतोष शुक्रवारी दुपारी पिंपरीतील साधू वासवानी उद्यानाजवळील एका हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी आला होता. त्याच्या बरोबर दोन मित्र होते. ओम शिव हॉटेलमध्ये चहा पीत असताना दुपारी तीन वाजून २२ मिनिटांनी तेथे आलेल्या सुमारे सात ते आठ जणांनी संतोष याच्यावर कोयत्याने हल्ला केला. दोघांनी गोळीबार सुरू केला. पाच गोळ्या या वेळी झाडल्या. त्यातील एक गोळी संतोष याच्या डोक्याला घासून गेली. तर पाठीला व पोटाला एक-एक गोळी घासून गेली आहे.

संतोषला वाचविण्यासाठी त्याच्या तीन मित्रांनी या हल्ल्यातून वाचण्यासाठी हॉटेलमधील वस्तू हल्लेखोरांच्या दिशेने फेकण्यास सुरुवात केली. हॉटेलमधील टेबल, दूध हल्लेखोरांच्या अंगावर फेकले. घटनास्थळावरून पोलिसांनी एक पिस्तूल, एक जिवंत काडतूस, मॅगझिन, दोन कोयते जप्त केले आहेत. संतोष याच्यावर खुनासह तीन गुन्हे दाखल आहेत.

पत्रकार परिषद आणि गोळीबार

चिंचवड पोलिसांनी गुन्हेगारांना पकड १९ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. शहर पोलिस गुन्हेगारी थोपविण्यासाठी काय-काय करीत आहेत, याचा पाढा अतिरिक्त पोलिस आयुक्त शशिकांत शिंदे वाचून दाखवत होते. तर दुसरीकडे त्या वेळी पिंपरीत भरदिवसा गोळीबाराची घटना घडली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज