म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपी) बस कात्रज चौकात सुरू ठेवून दुसरीकडे गेलेल्या चालकाला पीएमपी प्रशासनाने बुधवारी बडतर्फ केले आहे. तसेच ठेकेदाराकडून दहा हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. कात्रज चौकात मंगळवारी चालक बस सुरू ठेवून अन्यत्र गेल्यामुळे मोठा अपघात झाला होता. या पार्श्वभूमीवर पीएमपीकडून ही कारवाई करण्यात आली.