अ‍ॅपशहर

विद्यार्थी सुरक्षेवर आयुक्तांची नजर

नवी दिल्लीतील रायन स्कूलमध्ये झालेल्या विद्यार्थ्यांच्या खुनानंतर शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी पोलिस सज्ज झाले आहेत. शहरातील शाळा आणि महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला घेणार आहेत. त्यासाठी त्यांनी शहरातील सर्व शाळा, महाविद्यालयांच्या मुख्याध्यापक आणि प्राचार्यांची येत्या मंगळवारी (१९ सप्टेंबर) बैठक बोलविली आहे.

Maharashtra Times 16 Sep 2017, 4:43 am
मुख्याध्यापकांच्या बैठकीचे मंगळवारी आयोजन
महाराष्ट्र टाइम्स.कॉम police commissioner taken care of students
विद्यार्थी सुरक्षेवर आयुक्तांची नजर

म. टा. प्रतिनिधी, पुणे

नवी दिल्लीतील रायन स्कूलमध्ये झालेल्या विद्यार्थ्यांच्या खुनानंतर शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी पोलिस सज्ज झाले आहेत. शहरातील शाळा आणि महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला घेणार आहेत. त्यासाठी त्यांनी शहरातील सर्व शाळा, महाविद्यालयांच्या मुख्याध्यापक आणि प्राचार्यांची येत्या मंगळवारी (१९ सप्टेंबर) बैठक बोलविली आहे.
गुडगाव येथील रायन इंटरनशॅनल स्कूलमध्ये सात वर्षाच्या विद्यार्थ्याचा शाळेत चाकूने वार करून खून करण्यात आला. या घटनेचे पडसाद देशभर उमटले. रायन इंटरनॅशनल स्कूलच्या शाखा ज्या शहरांमध्ये आहेत, त्या ठिकाणचे पालकही भयभीत झालेले आहेत. शहरात मोठ्या प्रमाणात शाळा आणि महाविद्यालये आहेत. पुणे पोलिसांनी सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी पहिली ते बारावीपर्यंतचे शिक्षण देणाऱ्या सर्व शाळा-महाविद्यालयांच्या मुख्याध्यापक आणि प्राचार्यांची बैठक आयोजित केली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळांकडून काय उपाययोजना करण्यात आल्या आहेत. याची माहिती घेतली जाणार आहे. तसेच, शाळांनी सुरक्षेसाठी काय करावे याची माहिती देण्यात येणार आहे.
बैठक १९ सप्टेंबर रोजी कॅम्प परिसरातील नेहरू मेमोरियल हॉल येथे सायंकाळी चार वाजता होणार आहे. या बैठकीला शाळांचे मुख्याध्यापक, प्राचार्य उपस्थित राहण्यासाठी लेखी निमंत्रण देण्यात आले आहे. तसेच, या बैठकीला पोलिस ठाण्यातील विशेष बाल पथकाचे अधिकारीही उपस्थित रहाणार आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज