अ‍ॅपशहर

prakash Ambedkar : अन्यथा १० ऑगस्टनंतर रस्त्यावर उतरून कायदा हातात घेऊ; प्रकाश आंबेडकरांचा इशारा

एसटी महामंडळाच्या बसेस व विविध महानगरपालिकांच्या बस रस्त्यावर कधी धावणार हे सरकारनं स्पष्ट करावं, जर सरकार हे स्पष्ट करणार नसेल तर, १० ऑगस्टनंतर कधीही रस्त्यावर उतरुन कायदा हातात घेऊ. (prakash Ambedkar)

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 Aug 2020, 6:41 pm
पुणेः एसटी महामंडळाच्या बसेस व विविध महानगरपालिकांच्या बस रस्त्यावर कधी धावणार? हे सरकारनं स्पष्ट करावं, जर सरकार हे स्पष्ट करणार नसेल तर, १० ऑगस्टनंतर कधीही रस्त्यावर उतरुन कायदा हातात घेऊ, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम prakash ambedkar


प्रकाश आंबेडकर यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दुकानांची सम - विषम पद्धत कधी बंद करणार? छोटे दुकानदार, हातावर पोट असलेले कामगार यांची उपासमार होत आहे. एसटीच्या कर्मचाऱ्यांना दोन महिने पगार नाही? सार्वजनिक वाहतूक कधी सुरू होणार? सरकार हे स्पष्टपणे सांगणार नसेल तर १० ऑगस्टनंतर आम्ही कधीही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा आंबेडकर यांनी दिला आहे.

वाचाः कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या वाटेत आणखी एक विघ्न; टनेलची भिंत कोसळली

राज्यात पावसानं धुमाकुळ घातला आहे. या महिन्यात १५ दिवस पाऊस पडणार असल्याचं सांगण्यात येतंय अनेक ठिकाणी पूर-परिस्थिती निर्माण झालीये. त्यामुळं फक्त करोना-करोना म्हणत बसू नका, पुराच्या संबंधित काय उपाययोजना केल्या आहेत त्याचं उत्तर द्या?, असा सवालही त्यांनी यावेळी केला आहे.

वाचाः हे निसर्गाचं तांडव नृत्य तर नाही ना? आनंद महिंद्रांनी शेअर केला व्हिडिओ

हॉटस्पॉटमध्ये या वर्षाच्या तुलनेने गेल्यावर्षी अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. पुण्यात गेल्या वर्षी मे महिन्यात ४ हजार ००७ मृत्यू झाले तर, यावर्षी मे महिन्यात १ हजार ६०५ मृत्यू झाले आहेत. तर, मुंबईत ३,०४६ मृत्यू झाले, तर यावर्षी २,८६० मृत्यूंची नोंद झाली, ही आकडेवारी केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाकडून मिळाली असल्याचा दावा यावेळी त्यांनी केला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज