अ‍ॅपशहर

पूर्ववैमनस्यातून खराडीत खून

पूर्ववैमनस्यातून तीन जणांच्या टोळक्याने तरुणाच्या डोक्यावर आणि पाठीवर कोयत्याने वार करून खून केल्याची घटना शुक्रवारी रात्री खराडी येथील थिटे वस्ती येथे घडली. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे.

Maharashtra Times 18 Feb 2018, 1:14 pm
म. टा. प्रतिनिधी, येरवडा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम precursed murder
पूर्ववैमनस्यातून खराडीत खून


पूर्ववैमनस्यातून तीन जणांच्या टोळक्याने तरुणाच्या डोक्यावर आणि पाठीवर कोयत्याने वार करून खून केल्याची घटना शुक्रवारी रात्री खराडी येथील थिटे वस्ती येथे घडली. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे.

पवन बाबुराव कांबळे (वय २०, रा. काळूबाईनगर, थिटे वस्ती, खराडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी प्रितम गौतम कसबे (वय २३, रा. थिटे वस्ती) याने तक्रार दिली आहे. त्यावरून अमर गाडे (वय २३) आणि सुजित जाधव (वय २२, रा. थिटे वस्ती) यांना अटक केली आहे. त्यांचा एक साथीदार फरार झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'पवन कांबळे याचे वर्षभरापूर्वी किशोर शिंदे, अमर गाडे आणि सुजित जाधव यांच्याशी भांडणे झाली होती. शुक्रवारी रात्री साडे दहाच्या सुमारास पवन थिटे वस्ती येथील भाजी मंडई रस्त्यावरून जात असताना तिघे जण तिथे आले. त्या वेळी आरोपींनी पवनला थांबून शिवीगाळ करून धारदार कोयत्याने त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याच्या डोक्यात, पाठीवर आणि खांद्यावर कोयत्याने वार करून पळून गेले. कोयत्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पवनचा यात मृत्यू झाला. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी दोघांना अटक केली, तर एक जण पळून गेला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज