शब्दसृष्टी संस्था आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या हिंदी विभागातर्फे आज, सोमवारी (१ जुलै) 'शब्दसृष्टी डॉ. विजया स्मृती जीवन गौरव सन्माना'चे वितरण आणि मीडिया विशेषांकाच्या लोकार्पणाचा कार्यक्रम आयोजिण्यात आला आहे. विद्यापीठाच्या संस्कृत प्रगत अध्ययन केंद्रात दुपारी तीन वाजता हा कार्यक्रम होणार आहे. डॉ. आनंदप्रकाश दीक्षित यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून, विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राम ताकवले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
‘शब्दसृष्टी’तर्फे कार्यक्रम
शब्दसृष्टी संस्था आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या हिंदी विभागातर्फे आज, सोमवारी (१ जुलै) 'शब्दसृष्टी डॉ...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Jul 2019, 4:00 am