अ‍ॅपशहर

पुण्यातील आंबेगाव येथील किर्तनकाराने केला 'हा' वर्ल्ड रेकाॅर्ड

आंबेगाव तालुक्यातील प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प बाजीराव महाराज बांगर यांनी सलग १२ तास २० मिनिट कीर्तन करून वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. नारायणगाव येथील मुक्ताई मंगल कार्यालय येथे १४ जून रोजी सकाळ ९ वाजता तुकाराम महाराजांच्या उपदेशपर प्रकरणातील तीन चरणांचा अभंग घेत कीर्तनाला प्रारंभ केला.

Authored byटीम मटा ऑनलाइन | Edited byप्रशांत पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 16 Jun 2022, 10:31 pm
पुणे : आतापर्यंत अनेक रेकॉर्ड झालेले पाहिले किंवा अनेक रेकॉर्ड होत आहेत. मात्र, वारकरी सांप्रदयात किर्तनावर वर्ल्ड रेकॉर्ड केलेलं कधी ऐकलं आहे का?. आंबेगाव तालुक्यातील प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प बाजीराव महाराज बांगर यांनी सलग १२ तास २० मिनिट कीर्तन करून वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. नारायणगाव येथे त्यांनी हा रेकॉर्ड केला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Pune Ambegaon Kirtankar Bajirao Maharaj Bangar performed world record for 12 hours and 20 minutes in a row.
पुण्यातील आंबेगाव येथील किर्तनकाराने केला 'हा' वर्ल्ड रेकाॅर्ड


बाजीराव महाराज बांगर हे मूळचे आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव खडकी गावचे असून १२ वर्षांपासून ते कीर्तन सेवा करत आहेत. कुठलाही सराव नसताना गेली १२ वर्षांपासून कीर्तन सेवा देणारे शिवचरित्र कथाकार ह.भ.प. बाजीराव महाराज बांगर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातून प्रेरणा घेत पावनखिंडीच्या लढाईत १७ तास खिंड लढविणाऱ्या मावळ्यांची लढाई हीच त्यांची प्रेरणा ठरली. १७ तास मावळे लढाई करू शकतात, तर आपणही १२ तास कीर्तन का करू शकत नाही. असा निश्चय त्यांनी केला.

एकेकाळी म्हणेल तो शब्द अंतिम होता, पण आता मोदी चंद्राबाबूंना भेटीची वेळही का देत नाहीत?
नारायणगाव येथील मुक्ताई मंगल कार्यालय येथे १४ जून रोजी सकाळ ९ वाजता तुकाराम महाराजांच्या उपदेशपर प्रकरणातील तीन चरणांचा अभंग घेत कीर्तनाला प्रारंभ केला. सलग १२ तास २० मिनिटानंतर कीर्तन संपवून वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव कोरले. या वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियासाठी हभप बाजीराव महाराज बांगर यांना किरण महाराज बनकर, माऊली महाराज कुंजीर, नितीन महाराज सुक्रे, विशाल महाराज बांगर, विठ्ठल महाराज पोपळघट, विठ्ठल जाधव (चोपदार) व चंद्रकांत निकम (विणेकर) यांच्यासह २२ जणांची साथ लाभली. याचबरोबर टाळकरी, गायक, वादक यांनीही साथ दिली.

महत्वाचे लेख