अ‍ॅपशहर

आयुक्तांवर कारवाई करू

लोकप्रतिनिधींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे, पुण्याचे महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांची चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधिमंडळाला दिले. ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पात कोणत्याही स्वरूपात लोकप्रतिनिधींचे अधिकार कमी केले जाणार नाहीत, असा निर्वाळाही मुख्यमंत्र्यांनी दिला.

Maharashtra Times 31 Mar 2016, 3:00 am
म. टा. प्रतिनिधी, पुणे लोकप्रतिनिधींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे, पुण्याचे महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांची चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधिमंडळाला दिले. ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पात कोणत्याही स्वरूपात लोकप्रतिनिधींचे अधिकार कमी केले जाणार नाहीत, असा निर्वाळाही मुख्यमंत्र्यांनी दिला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षा आणि राज्यसभेच्या खासदार वंदना चव्हाण यांना लिहिलेल्या पत्रात कुणाल कुमार यांनी आक्षेपार्ह शब्द वापरले. या पत्राचा सर्वपक्षीय सदस्यांनी निषेध केला असून, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी फडणवीस यांच्याकडे करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर बुधवारी विधिमंडळात ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पावरील चर्चेत सर्व लोकप्रतिनिधींशी संवाद वाढवून, त्यांना सहभागी करून घेण्याची गरज आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली. आयुक्तांसारख्या व्यक्तीने अशा स्वरूपाची भाषा वापरणे योग्य आहे का, अशी विचारणाही त्यांनी केली. त्यावर खुलासा करताना, आयुक्तांवर कारवाईचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. तसे झाल्यास आयुक्तांच्या मनमानी कारभाराला काही प्रमाणात तरी आळा बसेल, अशी अपेक्षा राजकीय नेत्यांकडून व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pune corporation news
आयुक्तांवर कारवाई करू


लोकप्रतिनिधींचे अधिकार कमी करणार नाही

लोकप्रतिनिधींच्या हक्कांवर गदा येणार असल्याचा आरोप काँग्रेसचे भाई जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे, अनिल भोसले यांनी केला. तर, पुण्याच्या आयुक्तांनी ‘स्मार्ट सिटी’शिवाय इतर कोणत्याही प्रश्नात लक्ष घालू नये, असे आदेश दिल्याची उपरोधिक टिप्पणी अनंत गाडगीळ यांनी केली. त्यावर स्पष्टीकरण देताना, मुख्यमंत्र्यांनी महापालिकेतील पदाधिकाऱ्यांना कंपनीच्या संचालक मंडळावर स्थान देण्यात आले असून, कोणाचेही अधिकार कमी केलेले नाहीत, अशी ग्वाही दिली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज