अ‍ॅपशहर

उद्योगपतीच्या कारमधून रोकड पळविली

उद्योगपतीच्या कारचे लॉक उघडून चोरांनी पाच लाख रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना बिबवेवाडी-कोंढवा रस्त्यावर घडली. या प्रकरणी मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंधरा मिनिटांमध्ये रोकडची बॅग मगरपट्टा येथे आढळून आली.

Maharashtra Times 22 Mar 2017, 3:00 am
पुणे : उद्योगपतीच्या कारचे लॉक उघडून चोरांनी पाच लाख रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना बिबवेवाडी-कोंढवा रस्त्यावर घडली. या प्रकरणी मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंधरा मिनिटांमध्ये रोकडची बॅग मगरपट्टा येथे आढळून आली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pune crime news
उद्योगपतीच्या कारमधून रोकड पळविली


याबाबत राकेश जैन (वय ४२, रा. बिबवेवाडी-कोंढवा रस्ता) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उंड्री येथे राकेश जैन यांची केमिकल कंपनी आहे. सोमवारी दुपारी त्यांनी बँकेतून पाच लाख रुपये काढले. ती बॅग कारमध्ये ठेवली. काही वेळाने दोघे जण दुचाकीवरून आले. त्यांनी कारचे चाक पंक्चर झाल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांनी बिबवेवाडी-कोंढवा रस्यावरील इशा एमरल्ड सोसायटीच्या पुढे असलेल्या पंक्चरच्या दुकानावर कार नेली. तेथे पंक्चर काढण्यासाठी कार लावलेली असताना कारचे लॉक चोरांनी उघडून रोकडसह बॅग लंपास केली. जैन यांनी याची पोलिसांना माहिती दिल्यानंतर त्यांनी त्वरित तपास सुरू केला. काही वेळाने जैन यांना त्यांची बॅग मगरपट्टा येथे पडल्याची माहिती एकाने फोन करून दिली. त्या वेळी पोलिस त्या ठिकाणी गेले असता बॅगमधील रोकड चोरीला गेली होती. जैन यांची महत्त्वाची कागदपत्रे त्यांना मिळाली.

पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले असता त्यांना त्यामध्ये स्पष्ट काहीही दिसले नाही. या प्रकरणी उपनिरीक्षक ए. डी. पडळकर हे तपास करीत आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज