अ‍ॅपशहर

जागतिक स्तरावरही ‘पुणे सुपरफास्ट’

पुणे : लंडन, लॉस एंजेलिस, बोस्टन आणि दुबईपेक्षा पुणेकरांना दर वर्षी दरडोई अधिक वीज मिळते, लंडन व लॉस एंजेलिसच्या तुलनेत पुण्यात झाडांची संख्या अधिक आहे. प्रत्येकी एक लाख लोकसंख्येमागे पुण्यातून या शहरांपेक्षा अधिक पेटंट्स दाखल होतात, तर या शहरांच्या तुलनेत १५ ते २४ वयोगटातील लोकसंख्येचे प्रमाणही पुण्यात सर्वाधिक आहे. त्यामुळे पुण्याला वर्ल्ड कौन्सिल ऑन सिटी डेटाचे ‘प्लॅटिनम सर्टिफिकेट’ मिळाले आहे.टाटा ट्रस्टने ‘वर्ल्ड कौन्सिल ऑन सिटी डेटा’च्या सहकार्याने ‘सिटी डेटा फॉर इंडिया’ ही पाहणी केली. ‘आयएसओ ३७१२०’नुसार १७ संकल्पनांवर आधारित विविध १०० मुद्द्यांनुसार ही पाहणी करण्यात आली. भारतातील फक्त पुणे, सुरत आणि जमशेदपूर ही शहरेच हे सर्टिफिकेट मिळविण्यास पात्र ठरली. या पाहणीतील तुलनेसाठी निकषांची निवड करण्याचे स्वातंत्र्य संबंधित शहरांना होते, अशी माहिती टाटा ट्रस्टचे पार्टनरशीप अँड टेक्नॉलॉजी विभागाचे प्रमुख प्रभात पाणी यांनी ‘मटा’ ला दिली. ऊर्जेच्या वापराबाबत या पाहणीतील ४१ शहरांमध्ये पुण्याचा ४१ वा क्रमांक लागतो. पुण्यात दर वर्षी दरडोई ७२९.९५ किलोवॉट विजेचा वापर होतो. हा आकडा दुबई, लॉस एंजेलिस, बोस्टन, ब्रिस्बन आणि लंडनपेक्षा अधिक आहे.तरुणांची संख्या अधिकया पाहणीनुसार पेटंट्स दाखल करण्यातही पुणे आघाडीवर असल्याचे निदर्शनास आले आहे. पुण्यात दर एक लाख लोकसंख्येमागे दर वर्षी १०.७७ पेटंट्स दाखल होतात, तर ब्यूनॉस आयर्समध्ये हे प्रमाण ८.९ आणि लंडनमध्ये अवघे ३.४ इतके आहे. लोकसंख्येच्या दृष्टीनेही पुण्याची काही खास वैशिष्ट्ये आहेत. पुण्यातील १८.५१ टक्के लोकसंख्या ही १५ ते २४ या वयोगटातील आहे. लंडनमध्ये हेच प्रमाण १२.१९ टक्के, दुबईत ११.२३ टक्के आणि अॅमस्टरडॅममध्ये १३ टक्के इतके आहे. त्यावरून पुण्याला कौशल्य विकास, व्यावसायिक प्रशिक्षण आणि रोजगारनिर्मितीत योग्य लक्ष देऊन आर्थिक उन्नती साधण्याची संधी असल्याचे स्पष्ट होते.

Maharashtra Times 9 Aug 2017, 5:28 am
पुणे : लंडन, लॉस एंजेलिस, बोस्टन आणि दुबईपेक्षा पुणेकरांना दर वर्षी दरडोई अधिक वीज मिळते, लंडन व लॉस एंजेलिसच्या तुलनेत पुण्यात झाडांची संख्या अधिक आहे. प्रत्येकी एक लाख लोकसंख्येमागे पुण्यातून या शहरांपेक्षा अधिक पेटंट्स दाखल होतात, तर या शहरांच्या तुलनेत १५ ते २४ वयोगटातील लोकसंख्येचे प्रमाणही पुण्यात सर्वाधिक आहे. त्यामुळे पुण्याला वर्ल्ड कौन्सिल ऑन सिटी डेटाचे ‘प्लॅटिनम सर्टिफिकेट’ मिळाले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pune is superfast in world
जागतिक स्तरावरही ‘पुणे सुपरफास्ट’

टाटा ट्रस्टने ‘वर्ल्ड कौन्सिल ऑन सिटी डेटा’च्या सहकार्याने ‘सिटी डेटा फॉर इंडिया’ ही पाहणी केली. ‘आयएसओ ३७१२०’नुसार १७ संकल्पनांवर आधारित विविध १०० मुद्द्यांनुसार ही पाहणी करण्यात आली. भारतातील फक्त पुणे, सुरत आणि जमशेदपूर ही शहरेच हे सर्टिफिकेट मिळविण्यास पात्र ठरली. या पाहणीतील तुलनेसाठी निकषांची निवड करण्याचे स्वातंत्र्य संबंधित शहरांना होते, अशी माहिती टाटा ट्रस्टचे पार्टनरशीप अँड टेक्नॉलॉजी विभागाचे प्रमुख प्रभात पाणी यांनी ‘मटा’ ला दिली. ऊर्जेच्या वापराबाबत या पाहणीतील ४१ शहरांमध्ये पुण्याचा ४१ वा क्रमांक लागतो. पुण्यात दर वर्षी दरडोई ७२९.९५ किलोवॉट विजेचा वापर होतो. हा आकडा दुबई, लॉस एंजेलिस, बोस्टन, ब्रिस्बन आणि लंडनपेक्षा अधिक आहे.
तरुणांची संख्या अधिक
या पाहणीनुसार पेटंट्स दाखल करण्यातही पुणे आघाडीवर असल्याचे निदर्शनास आले आहे. पुण्यात दर एक लाख लोकसंख्येमागे दर वर्षी १०.७७ पेटंट्स दाखल होतात, तर ब्यूनॉस आयर्समध्ये हे प्रमाण ८.९ आणि लंडनमध्ये अवघे ३.४ इतके आहे.
लोकसंख्येच्या दृष्टीनेही पुण्याची काही खास वैशिष्ट्ये आहेत. पुण्यातील १८.५१ टक्के लोकसंख्या ही १५ ते २४ या वयोगटातील आहे. लंडनमध्ये हेच प्रमाण १२.१९ टक्के, दुबईत ११.२३ टक्के आणि अॅमस्टरडॅममध्ये १३ टक्के इतके आहे. त्यावरून पुण्याला कौशल्य विकास, व्यावसायिक प्रशिक्षण आणि रोजगारनिर्मितीत योग्य लक्ष देऊन आर्थिक उन्नती साधण्याची संधी असल्याचे स्पष्ट होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज