अ‍ॅपशहर

शिळा भात फेकून दिला म्हणून वकील सासूची शिक्षक सुनेला मारहाण

शिळा भात खाल्ला नाही या कारणावरून सांगवी येथील एका वकील महिलेवर सुनेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेच्या पतीवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited byगणेश कदम | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Jan 2022, 11:21 am
म. टा. प्रतिनिधी । पिंपरी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Crime
वकील सासूची शिक्षक सुनेला मारहाण


शिळा भात का खाल्ला नाही, फेकून का दिला, असे म्हणत वकील सासूने आणि शिक्षक नवऱ्याने शिक्षिका असणाऱ्या सुनेला मारहाण केली. तसेच स्वयंपाक व्यवस्थित येत नसल्यानेही छळ केला. सांगवी पोलिस ठाण्यात या प्रकरणी पीडित शिक्षिकेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पती सारंग सुभाष सकपाळ (वय ३५) आणि सासू (दोघेही रा. नवी सांगवी) यांच्या विरोधात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाचा: 'नकली घोड्यावर बसणाऱ्या 'मैने'ला पद्म पुरस्कार दिला जातो, पण…'

१५ सप्टेंबर २०१९ ते १४ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत सांगवी येथील समर्थ नगर येथे हा प्रकार घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि आरोपी या दोघांचाही हा दुसरा विवाह आहे. फिर्यादी महिला या शिक्षिका आहेत. त्यांची सासू वकील असून पती एका खासगी शाळेत शिक्षक आहे. फिर्यादी यांच्या सासूचा स्वभाव संशयी आहे. घरातील कोणतीही गोष्ट वाया जाऊ नये हा त्यांचा मानस आहे. शिळा पडलेला स्वयंपाक फेकून द्यायचा नाही, खाऊन टाकायचा असा नियम त्यांच्या सासूने घालून दिला आहे. मात्र, काही दिवासांपूर्वी घरात पाहुणे आले होते. पाहूणे जेवायला बसल्यामुळे फिर्यादी महिलेने आपल्या सासूबाईंच्या ताटातील शिळा भात काढून घेतला. तुम्ही शिळा भात खाऊ नका, असे त्या म्हणाल्या. त्यानंतर संध्याकाळी फिर्यादी यांनी तो शिळा भात खाल्ला, तसे सासूलाही सांगितले. मात्र, सासूचा विश्वास बसेना. त्यांनी घरातील सर्व डस्टबिन तपासले. परंतु त्यांना फेकून दिलेला भात सापडला नाही. त्या वेळी फिर्यादी यांनी पुन्हा सांगितले की मी भात खाल्ला आहे. मात्र, तू भात खाल्ला नाही, फेकून दिला आहे, असे म्हणत सासूने सुनेला मारहाण केली. शिवीगाळ करत त्यांचा शारिरीक व मानसिक छळ केला.

Live: सिंधुताई सपकाळ यांच्यावर दुपारी १२ वाजता अंत्यसंस्कार

फिर्यादीचे कुटुंब सुशिक्षित आहे. सासू वकील तर नवरा शिक्षक आहे. फिर्यादी स्वतःही शिक्षिका आहेत. मात्र, सासूच्या संशयी स्वभावामुळे हा प्रकार घडला आहे. पोलिस तपास करत असून आरोपींचा शोध सुरू आहे. - कविता रुपनर, पोलिस उपनिरीक्षक, सांगवी

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज