अ‍ॅपशहर

पुणे-लोणावळा रेल्वेसाठी पिंपरी देणार २७५ कोटी

पुणे-लोणावळा रेल्वेच्या तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकच्या कामासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने त्यांच्या हिश्श्याचा २७५ कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारला द्यावा, असा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. तो मंगळवारी (१४ जून) होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे.

Maharashtra Times 12 Jun 2016, 1:13 am
पुणे-लोणावळा रेल्वेसाठी पिंपरी देणार २७५ कोटी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pune lonavla railway
पुणे-लोणावळा रेल्वेसाठी पिंपरी देणार २७५ कोटी


पिंपरी ः पुणे-लोणावळा रेल्वेच्या तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकच्या कामासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने त्यांच्या हिश्श्याचा २७५ कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारला द्यावा, असा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. तो मंगळवारी (१४ जून) होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे.

पुणे-लोणावळा रेल्वेच्या तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकच्या कामासाठी रेल्वे मंत्रालयाने हिरवा कंदील दाखवला आहे. त्यासाठी जमीन अधिग्रहण सोडून दोन हजार ३०६ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हा खर्च रेल्वे मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकारने प्रत्येकी ५० टक्के सहभागाने करावयाचा आहे. त्याबाबतची मान्यता मध्य रेल्वेने दिली असून, मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनला कळविले आहे. जमीन अधिग्रहण सोडून प्रकल्पाला प्रतिकिलोमीटर ३३ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे; तसेच प्रकल्पासाठी मुंबई नागरी परिवहन प्रकल्पाच्या (एमयूटीपी) धर्तीवर राज्य सरकारकडून ५० टक्के आर्थिक सहभाग अपेक्षित धरला आहे. राज्य सरकारने ज्याप्रमाणे मुंबई नागरी परिवहन प्रकल्पामध्ये सरकारच्या वतीने द्यावयाची ५० टक्के रक्कम मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणामार्फत दिली जाते. त्याचप्रमाणे पुणे-लोणावळा दरम्यानच्या या प्रकल्पासाठी (पीयूटीपी) राज्य सरकारकडून अपेक्षिलेली ५० टक्के रक्कम पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका, प्राधिकरण, पुणे प्रादेशिक विकास महामंडळाने द्यावी, असे आदेश सरकारने दिले आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज