अ‍ॅपशहर

पुणे-मुंबई रेल्वे वाहतूक सुरळीत सुरू

चिंचवडजवळ रुळाला तडे गेल्याने मुंबईच्या दिशेने जाणारी रेल्वेवाहतूक आज पहाटे सुमारे सव्वा तास खोळंबली होती. रुळ दुरुस्तीनंतर सकाळी साडेसातच्या सुमारास वाहतूक पुन्हा सुरू झाली.

Maharashtra Times 31 Jan 2017, 11:16 am
मटा ऑनलाइन वृत्त । पुणे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pune mumbai train service regularize
पुणे-मुंबई रेल्वे वाहतूक सुरळीत सुरू


येथे चिंचवडजवळ रुळाला तडे गेल्याने मुंबईच्या दिशेने जाणारी रेल्वेवाहतूक आज पहाटे सुमारे सव्वा तास खोळंबली होती. रुळ दुरुस्त करण्यात आल्यानंतर सकाळी साडेसातच्या सुमारास वाहतूक पुन्हा सुरू झाली.

चिंचवड व आकुर्डी दरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्याचे सकाळी ६ वाजून १५ मिनिटांनी लक्षात आले. त्यानंतर तातडीने मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या सिंहगड एक्स्प्रेससह तीन लांब पल्ल्याच्या गाड्या अलिकडेच वेगवेगळ्या स्थानकांवर थांबविण्यात आल्या होत्या. पुणे-लोणावळा मार्गावरील लोकलचाही खोळंबा झाला होता. सकाळीच रेल्वे वाहतुकीचा खोळंबा झाल्याने चाकरमान्यांचे मात्र चांगलेच हाल झाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज