अ‍ॅपशहर

Pune: पुण्यात गणपती विसर्जनासाठी यंदा 'लय भारी' व्यवस्था

करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर येत असलेल्या गणेशोत्सवासाठी पुणे महापालिकेने जय्यत तयारी केली असून विसर्जनसाठी फिरत्य हौदांची व्यवस्था करून दिली जाणार आहे.

Authored byप्रशांत आहेर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13 Aug 2020, 7:13 pm
पुणे: करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या वर्षी गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करत नागरिकांनी मूर्तींचे विसर्जन घरीच करण्यासाठी प्राधान्य द्यावे, ज्या नागरिकांना घरी विसर्जन करणे गैरसोयीचे आहे फक्त अशाच नागरिकांसाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयासाठी एका फिरत्या विसर्जन हौदाची व्यवस्था करण्यात येणार आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम गणपती विसर्जन


मूर्ती लवकर विरघळण्यासाठी शाडू मातीच्या मूर्तीनाच प्राधान्य द्यावे. तसेच घरीच' श्रीं' चे विसर्जन करण्यासाठी पुणे महानगरपालिकेकडून सोडीयम बायकार्बोनेट मोफत पुरविण्यात येणार आहे. मूर्ती विक्रेते, प्रभागातील आरोग्य कोठ्या व क्षेत्रीय कार्यालयाचे ठिकाणी सोडीयम बायकार्बोनेट उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली जाणार असल्याचे महापौर मोहोळ म्हणाले.

वाचा: मंदिरं कधी खुली होणार?; राज्य सरकारनं दिली कोर्टात माहिती

'या वर्षी प्लॅस्टर ऑफ पॅरिस अथवा शाडू मातीच्या मूर्ती ऐवजी धातूच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करावी. अनंत चर्तुदशीला विसर्जन करून परत देव्हाऱ्यात ठेवता येऊ शकते. तसेच ज्या नागरिकांना मूर्तीचे दान करायचे असेल त्यांच्यासाठी पुणे महानगरपालिका व स्वयंसेवी संस्थाच्या मार्फत प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयांमध्ये व्यवस्था करण्यात येणार आहे.'

वाचा: 'सरकारमधील काही मंत्रीच उद्धव ठाकरेंची दिशाभूल करताहेत'

'गणेशोत्सवाच्या काळात प्रतिवर्षी पुणे शहरात जवळपास पाच लाख 'मूर्तींचे विसर्जन होते आणि जवळपास वीस ते पंचवीस लाख गणेशभक्त या दिवशी रस्त्यावर उतरतात. तथापि या वर्षी करोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अशा पद्धतीने एकत्र येणे हे मोठ्या संकटाला आमंत्रण देणे ठरेल. गेले पाच महिने पुणेकरांनी अतिशय जबाबदरीने या संकटात प्रशासनाला साथ दिली आहे. या गणेशोत्सवाच्या कालावधीतही सर्व पुणेकर गर्दी टाळून या करोनाच्या संकटावर मात करण्यासाठी सहकार्य करतील याची खात्री बाळगतो,' असेही महापौर म्हणाले.

वाचा: 'मीच मॅच्युअर, बाकी सगळे इमॅच्युअर असा माझा दावा नाही'

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज