अ‍ॅपशहर

अडीच हजार मिळकतकराचे धनादेश बाउन्स; पुणे महापालिका बजावणार नोटीस

या मिळकतधारकांकडून तब्बल एक कोटी २४ लाख रुपये येणे बाकी आहे. मिळकतकर भरण्याची मुदत उलटल्यानंतरही अद्याप या मिळकतधारकांनी कर न भरल्याने महापालिकेने त्यांना कायदेशीर नोटीस पाठविण्याची तयारी सुरू केली आहे.

Edited byम. टा. प्रतिनिधी | महाराष्ट्र टाइम्स 4 Feb 2023, 7:38 am
पुणे : महापालिकेचा मिळकतकर भरण्यासाठी सुमारे अडीच हजार मिळकतधारकांनी दिलेले धनादेश न वठता परत आले आहेत. मात्र, त्यानंतरही त्यांनी मिळकतकर भरलेला नसल्यामुळे महापालिका मिळकतधारकांना नोटीस बजावणार आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pune municipal co
अडीच हजार मिळकतकराचे धनादेश बाउन्स; पुणे महापालिका बजावणार नोटीस


महापालिका मिळकतधारकांकडून ऑनलाइन, धनादेशाद्वारे आणि थेट रोख स्वरूपात मिळकत कर स्वीकारते. मागील काही वर्षांत ऑनलाइनसह धनादेशाद्वारे मिळकत कर भरण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेक नागरिक मोठ्या प्रमाणातील मिळकतकराची थकबाकी धनादेशाद्वारे भरतात. मात्र, दर वर्षी यांपैकी काही धनादेश बँक खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने परत जातात. महापालिकेने बँकेत भरलेले धनादेश न वठल्यास महापालिकेलाही दंड भरावा लागतो. पहिला धनादेश परत आल्यानंतर काही मिळकतधारक दुसरा धनादेश देतात अथवा ऑनलाइन किंवा रोख स्वरूपात मिळकत कर भरतात. मात्र, काही मिळकतधारक याकडे दुर्लक्ष करतात.

‘चालू आर्थिक वर्षातदेखील दोन हजार ४९९ मिळकतधारकांचे धनादेश बाउन्स झाले आहेत. या मिळकतधारकांकडून तब्बल एक कोटी २४ लाख रुपये येणे बाकी आहे. मिळकतकर भरण्याची मुदत उलटल्यानंतरही अद्याप या मिळकतधारकांनी कर न भरल्याने महापालिकेने त्यांना कायदेशीर नोटीस पाठविण्याची तयारी सुरू केली आहे. येत्या काही दिवसांत या नोटीस पाठविण्यात येतील,’ अशी माहिती मिळकत कर विभागाचे प्रमुख अजित देशमुख यांनी दिली.

महत्वाचे लेख