अ‍ॅपशहर

‘पुणे-नाशिक’साठी लवकरच मान्यता; मुख्यमंत्र्यांची रेल्वेमंत्र्यांशी चर्चा

पुणे-नाशिक प्रकल्पासाठीच्या सर्व आवश्यक परवानग्या प्राप्त झाल्या असून, नीती आयोगाने काही महिन्यांपूर्वी या प्रकल्पाला हिरवा कंदील दर्शविला आहे. त्यामुळे हा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी केंद्रीय मंत्रिमंडळासमोर सादर केला जाणे अपेक्षित आहे.

Edited byम. टा. प्रतिनिधी | महाराष्ट्र टाइम्स 14 Sep 2022, 11:23 am
पुणे : पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रीमंडळाच्या मान्यतेसाठी प्रलंबित असून, त्याला लवकर मान्यता देण्याची विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना केली. राज्यातील इतर महत्त्वाच्या रेल्वे प्रकल्पांना गती देण्याच्या सूचना शिंदे यांनी केल्या.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम semi high speed
‘पुणे-नाशिक’साठी लवकरच मान्यता


‘महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन’तर्फे (महारेल) राबविण्यात येणाऱ्या पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्गासह इतर रेल्वे प्रकल्पांचे सादरीकरण मंगळवारी शिंदे यांच्यासमोर झाले. या वेळी खासदार श्रीरंग बारणे, हेमंत गोडसे, राहुल शेवाळे यांच्यासह ‘महारेल’चे व्यवस्थापकीय संचालक राजेशकुमार जयस्वाल, मुख्य सल्लागार सत्यप्रकाश यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पुणे-नाशिक प्रकल्पासाठीच्या सर्व आवश्यक परवानग्या प्राप्त झाल्या असून, नीती आयोगाने काही महिन्यांपूर्वी या प्रकल्पाला हिरवा कंदील दर्शविला आहे. त्यामुळे हा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी केंद्रीय मंत्रिमंडळासमोर सादर केला जाणे अपेक्षित आहे. तो लवकर सादर व्हावा, या उद्देशाने शिंदे यांनी आढावा बैठकीतूनच थेट रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी संपर्क साधला; तसेच पुणे-नाशिक रेल्वे मार्गाचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत मान्यतेसाठी ठेवण्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विनंतीवर कार्यवाही करण्यात येईल, असा सकारात्मक प्रतिसाद रेल्वेमंत्र्यांनी दिल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले.

पुणे नाशिक प्रकल्पाविषयी

-पुणे-नाशिक सेमी हाय स्पीड प्रकल्प २३५ कि.मीचा आहे.

- या प्रकल्पासाठी १६ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

-त्यामध्ये राज्य सरकारचा हिस्सा तीन हजार २७३ कोटी रुपयांचा आहे.

-केंद्र सरकारकडून तेवढेच अनुदान मिळण्याची शक्यता आहे.

-केंद्र, राज्य सरकारच्या अनुदानासह उर्वरत निधी कर्ज स्वरूपात उभारण्यात येणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज