म. टा. प्रतिनिधी | पुणे
पुण्यातील शिवणे येथील अडीच वर्षांच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या केल्याप्रकरणी त्यांच्याच इमारतीत राहणाऱ्या रंगकामगाराला अटक करण्यात आली आहे. आरोपी हा तीन वर्षांपासून त्या ठिकाणी राहतो. त्याने शनिवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास तिचे अपहरण केले होते.
सिंहगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवणे येथील रहिवासी विजय शिवगणे यांची मुलगी श्रुती हिचे शनिवारी मध्यरात्री घरातून अपहरण करण्यात आले होते. तिच्या पालकांनी आजूबाजूला शोधाशोध करूनही ती सापडली नाही. अखेर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. रविवारी सकाळी एका लहान मुलीचा मृतदेह प्रायोजा सिटीच्या मागे सापडल्याची माहिती स्थानिकांनी पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पाहणी केली असता मृतदेह श्रुतीचा असल्याचे स्पष्ट झाले. तिच्यावर लैंगिक अत्याचार करून हत्या केल्याचे निष्पन्न झाले. या घटनेचा तपास गुन्हे शाखा आणि सिंहगड पोलीस करत होते. चौकशीदरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी श्रुती राहत असलेल्या इमारतीतील रंगकामगाराला अटक केली आहे.