अ‍ॅपशहर

धोका वाढला! पुण्यात करोनाच्या नव्या विषाणूचा आणखी एक रुग्ण सापडला; रुग्णसंख्या ८ वर

पुण्यात करोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या रुग्णाचे निदान झाले आहे. एका ३१ वर्षीय महिलेला बी.ए. ५ प्रकारच्या विषाणूचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे नव्या विषाणूची लागण झालेल्यांची संख्या ८ वर पोहोचली आहे.

Authored byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 7 Jun 2022, 7:31 pm

हायलाइट्स:

  • करोनाच्या नव्या विषाणूचा आणखी एक रुग्ण सापडला
  • नव्या विषाणूच्या रुग्णांची संख्या ८ वर पोहोचली
  • पुण्यातील ३१ वर्षीय महिलेला बी. ए. ५ व्हेरिएंटची लागण
बातमी थोडक्यात वाचण्यासाठी अॅप डाउनलोड करा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pune records one more ba 5 omicron variant
संग्रहित छायाचित्र
पुणे: पुण्यात करोनाच्या ओमायक्रॉन या नव्या विषाणू प्रकाराच्या आणखी रुग्णाचे निदान झाले आहे. ३१ वर्षाच्या या महिलेला बी ए.५ या प्रकारच्या विषाणूचा संसर्ग झाल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे नव्या विषाणू प्रकारचे पुण्यात रुग्णसंख्या आठपर्यंत पोहोचली आहे.
पुणे शहरात काही दिवसांपूर्वी करोनाच्या बी ए.४ आणि बी ए.५ या दोन प्रकारच्या विषाणूंचे रुग्ण आढळले होते. पुण्यातील आयसर या प्रयोगशाळेत या रुग्णांच्या चाचण्यांची जिनोम सिक्वेसिंग करण्यात आले होते. त्या तपासणीमधून २८ मे रोजी पुण्यात नव्या विषाणू प्रकाराचा शिरकाव झाल्याचे अधोरेखित झाले होते. त्यावेळी नव्या विषाणूंचा सात जणांना संसर्ग झाल्याचे निदान झाले होते. करोनाचा हा विषाणू प्रकार ओमायक्रॉन या वंशावळीचा आहे. त्यानंतर आता मंगळवारी पुन्हा आणखी एक रुग्ण आढळल्याची नोंद राज्याच्या आरोग्य विभागाने केली आहे.
महाराष्ट्रात चौथ्या लाटेची सुरुवात? ठाण्यात १९२ तर मुंबईत १३६% करोनाचे रुग्ण वाढले
बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रुग्णांच्या केलेल्या जिनोम सिक्वेसिंगच्या (जनुकीय क्रमनिर्धारण) अहवालात पुणे शहरातील एका ३१ वर्षीय महिलेत बी ए.५ हा विषाणूचा प्रकार आढळला आहे. ही महिला पूर्णपणे लक्षणेविरहित होती. तसेच ती घरगुती विलगीकरणात बरी झाली आहे, अशी माहिती आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

महत्वाचे लेख