अ‍ॅपशहर

‘कमवा व शिका’च्या विमा रकमेत वाढ?

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थी विकास मंडळातर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘कमवा व शिका योजने’त विद्यार्थ्यांच्या विमा रकमेत वाढ होण्याची शक्यता आहे. विद्यापीठ प्रशासनाकडून येत्या काही दिवसांत ‘कमवा व शिकवा’ आणि विद्यार्थीकेंद्रीत योजनांचा आढावा घेण्यात येणार आहे.

Maharashtra Times 30 Nov 2017, 4:34 am
विद्यापीठ प्रशासन लवकरच आढावा घेणार
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pune university extends amount of earn and learn scheme
‘कमवा व शिका’च्या विमा रकमेत वाढ?


म. टा. प्रतिनिधी, पुणे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थी विकास मंडळातर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘कमवा व शिका योजने’त विद्यार्थ्यांच्या विमा रकमेत वाढ होण्याची शक्यता आहे. विद्यापीठ प्रशासनाकडून येत्या काही दिवसांत ‘कमवा व शिकवा’ आणि विद्यार्थीकेंद्रीत योजनांचा आढावा घेण्यात येणार आहे.
‘कमवा व शिका योजनेत विद्यार्थ्यांना दहा रुपयांत एका लाख रूपयांचा विमा मिळतो. योजनेचे मानधन विद्यार्थ्यांना संबंधित कॉलेजांकडून देण्यात येते. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने विद्यापीठ प्रशासनाकडे विम्याची रक्कम वाढविण्याची मागणी केली होती. विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या दहा रुपयांमध्ये विद्यापीठाने पंधरा रुपयांची भर घालून विम्याची एकूण रक्कम अडीच लाख रुपये करावी. तसेच, योजनेत काम करणाऱ्या विद्यार्थ्यांची रक्कम कॉलेजांना न देता थेट विद्यार्थ्यांना देण्यात यावी. त्यासाठी बायोमेट्रिक हजेरी प्रणालीचा वापर करावा. त्यामुळे विद्यार्थ्यांना पूर्ण रक्कम मिळेल आणि कॉलेजांच्या कारभारावर लक्ष ठेवता येईल, अशी मागणी मनविसेतर्फे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी केली होती. त्यावर विद्यापीठ प्रशासनाने विम्याच्या रकमेत वाढ करण्यासोबतच विद्यार्थी केंद्रीत योजनांचा आढावा घेण्याबाबत विचार करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.

स्वेटर कधी देणार?
हिवाळा सुरू होऊन दोन महिने उलटून गेले तरी कमवा व शिका योजनेत काम करणाऱ्या सुमारे १३०० विद्यार्थ्यांना अद्याप स्वेटर मिळालेले नाहीत. विद्यार्थ्यांना आता तीन डिसेंबरपर्यत स्वेटर मिळणार असल्याचे विद्यापीठ प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, हिवाळा संपल्यानंतर स्वेटर मिळू नये एवढी खबरदारी विद्यापीठाने घ्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज