अ‍ॅपशहर

‘विकास मार्गा’साठी रेल्वे

पुणे आणि नगर या शहरांदरम्यान रस्ते वाहतुकीत मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली असून, व्यवसाय व विविध कामांच्या निमित्ताने ये-जा करणाऱ्या दोन्ही शहरातील नागरिकांचा त्यामध्ये समावेश आहे. त्यामुळे येत्या काळात पुणे ते नगर हा विकास मार्ग होण्यासाठी दोन्ही शहरांना रेल्वे प्रवासी सेवेने जोडण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे.

Maharashtra Times 17 May 2017, 11:33 am
पुणे-नगरसाठी प्रवासी संघटनांकडून इंटरसिटी सुरू करण्याची मागणी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम railway for development road
‘विकास मार्गा’साठी रेल्वे


म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे आणि नगर या शहरांदरम्यान रस्ते वाहतुकीत मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली असून, व्यवसाय व विविध कामांच्या निमित्ताने ये-जा करणाऱ्या दोन्ही शहरातील नागरिकांचा त्यामध्ये समावेश आहे. त्यामुळे येत्या काळात पुणे ते नगर हा विकास मार्ग होण्यासाठी दोन्ही शहरांना रेल्वे प्रवासी सेवेने जोडण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे. त्यासाठी पुणे आणि नगर येथील प्रवासी संघटनांकडून सातत्याने मागणी केली जात आहे.

सध्या पुणे-मनमाड मार्गावरून जम्मू, उत्तरप्रदेश, बिहार, बंगाल, दिल्ली इत्यादी मार्गांवर जाणाऱ्या गाड्या. नगरमार्गे जातात. या गाड्यांना पुण्याहून दौंड आणि त्यानंतर नगरचा थांबा आहे. मात्र, दौंड ते नगर या दरम्यान मोठी शहरे व गावे असून, तेथील स्टेशनवर या गाड्या थांबविल्या जात नाहीत. त्यामुळे अनेक जण पुण्याला येण्यासाठी दौंडपर्यंत दुचाकीवर येऊन तेथून पुढील प्रवास रेल्वेने करतात. आता पुण्यापासून दौंडपर्यंत इंटरसिटी एक्स्प्रेस सुरू आहे. तेथून नगर फक्त ८० किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे पुणे-नगर इंटरसिटी रेल्वे सेवा सुरू करण्यास अडचण येणार नाही. नगर-पुणे रस्त्यावर दिवसेंदिवस वेगाने वाढणारी वाहनांची संख्या, वाढती अपघातांची संख्या, त्यांत जाणारे बळी, त्यामुळे रत्याच्या रुंदीकरणाची सातत्याने वाढती गरज, मात्र त्यासाठी जागेची अनुपलब्धता, परिणामी दळणवळणावर होणार विपरित परिणाम, लोकांचा प्रवासासाठी होणारा खर्च व वाढणारा वेळ याचा विचार करता रेल्वे सेवा हाच समर्थ पर्याय आहे. तशी रेल्वे सुरू झाल्यास दररोज नगर-पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिकांची व विद्यार्थ्यांची मोठी सोय होणार असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. नगर येथील रेल्वे कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी या मार्गासाठी गेल्या काही वर्षांपासून जोरदार मागणी लावून धरली आहे.

नगर जिल्ह्यामध्ये नगर शहर ही मोठी व्यापारी पेठ आहे. तसेच, शनिशिंगणापूर आणि शिर्डी ही प्रसिद्ध देवस्थाने आहेत. त्यामुळे नगरला पर्यटकांचा ओघ कायमच सुरू असतो. पुणे ते नगर रस्ते वाहतुकूसाठी सध्या जास्तीत जास्त दोन तासांचा कालावधी लागतो. मात्र, त्या तुलनेत दौंड मार्गे जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांना तीन ते साडेतीन तास लागतात. या मार्गावर राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या आणि खासगी बसची संख्या दीड हजाराच्या सुमारास आहे. त्यामुळे प्रवासी वाहतुकीसाठी अनुकूल परिस्थिती निश्चित आहे, याचा रेल्वे प्रशासनाने इंटरसिटी सुरू करण्यासाठी विचार करावा, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज