अ‍ॅपशहर

रेल्वेचा पार्सल विभाग हलविणार

दिवाळीत रेल्वे स्थानकावर होणारी गर्दी लक्षात घेता पुणे रेल्वे स्थानकावरील पार्सल विभाग तात्पुरत्या काळासाठी घोरपडी येथे हलविण्याचा विचार रेल्वे प्रशासन करीत आहे. स्टेशनवरील पादचारी पूल आणि पार्सल विभाग एकाच ठिकाणी असल्याने प्रवाशांना अडचण होते. त्यामुळे या स्टेशनचा तुलनेने कमी वापर होतो. पार्सल विभाग हलविल्यास या प्रवाशांना विनाअडथळा पुलाकडे जाता येणार आहे.

Maharashtra Times 12 Oct 2017, 4:13 am
प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी व्यवस्थापकांचा निर्णय
महाराष्ट्र टाइम्स.कॉम railway parcel department will shiift
रेल्वेचा पार्सल विभाग हलविणार


म. टा. प्रतिनिधी, पुणे

दिवाळीत रेल्वे स्थानकावर होणारी गर्दी लक्षात घेता पुणे रेल्वे स्थानकावरील पार्सल विभाग तात्पुरत्या काळासाठी घोरपडी येथे हलविण्याचा विचार रेल्वे प्रशासन करीत आहे. स्टेशनवरील पादचारी पूल आणि पार्सल विभाग एकाच ठिकाणी असल्याने प्रवाशांना अडचण होते. त्यामुळे या स्टेशनचा तुलनेने कमी वापर होतो. पार्सल विभाग हलविल्यास या प्रवाशांना विनाअडथळा पुलाकडे जाता येणार आहे.
परळ येथील एल्फिस्टन स्टेशनच्या पादचारी पुलावर चेंगराचेंगरी झाली. या पार्श्वभूमीवर खासदार अनिल शिरोळे यांनी पुणे रेल्वे स्टेशनची पाहणी केली. त्यानंतर प्रवाशांना सुरक्षितता प्रदान करण्यासाठी रेल्वेचे नवनियुक्त व्यवस्थापक मिलिंद देऊस्कर यांनी पार्सल विभाग हलविण्याबाबत चाचपणी सुरू केली आहे.
पुणे रेल्वे स्टेशनवर एकूण तीन पादचारी पूल आहेत. त्यापैकी सर्वांत जुना असलेल्या आणि दत्त मंदिराच्या जवळून जाणाऱ्या पादचारी पुलाचा सर्वाधिक वापर होतो. खूप गर्दी झाल्यावर या पुलाला हादरेही बसत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाकडून खबरदारी म्हणून विविध उपयोजना करण्यात येत आहे, असे देऊस्कर यांनी सांगितले.
दिवाळीच्या सुट्टीत रेल्वे प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढते. मुंबईतील घटना ताजी असताना आता खबरदारी घेणे आवश्यक आहे. तसेच, रेल्वे पोलिस कर्मचाऱ्यांची संख्याही वाढविण्यात येणार आहे. त्यांच्या माध्यमातून गर्दीवर नियंत्रण ठेवता येईल, असे देऊस्कर यांनी सांगिले.

समांतर पूल अन् स्काय वॉक
जुन्या पादचारी पुलाच्या समांतर नवीन पादचारी पूल आणि त्यांना जोडणारा स्कायवॉक उभारण्याच्या कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या निधीतून येत्या मार्चपर्यंत काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी एक दिवस स्टेशनवरील रेल्वे गाड्यांची वाहतूक बंद ठेवण्यास परवानगी मिळावी, अशी विनंती रेल्वे बोर्डाला केली आहे, असेही देऊस्कर यांनी स्पष्ट केले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज