अ‍ॅपशहर

‘राज’वैभव लुप्त होतेय...

लष्करीदृष्ट्या केलेली अजोड बांधणी, तीन माच्या आणि बालेकिल्ला, सुवेळा आणि संजीवनी माचीची देखणी तटबंदी, महाद्वाराची रचना तसेच बुरूजांमध्ये बेमालूमपणे लपवलेली गुप्त प्रवेशद्वारे, चंद्रतळे, पद्मावती आणि राजवाड्याचे तळे, तटात बांधलेले शौचकूप, भागीरथी, जननी, बह्मर्षी, रामेश्वर, पद्मावती अशा दैवतांची मंदिरे असा अवशेषसंपन्न दुर्ग म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या राजगडाची दिवसेंदिवस अधिक दुरवस्था होऊ लागली आहे. रखडलेल्या सदरेसह राजगडाच्या तटबंदीची दुरूस्ती पुरातत्व खात्याने चुकीच्या पद्धतीने केल्याने तटबंदीचे विद्रूपीकरण झाले आहे. संभाव्य जागतिक वारसा स्थळ म्हणून पाहिल्या जाणाऱ्या स्वराज्याच्या या राजधानीचे राजवैभवच लुप्त होण्याचा धोका त्यामुळे निर्माण झाला आहे.

Maharashtra Times 27 Jul 2016, 3:00 am
म. टा. प्रतिनिधी, पुणे लष्करीदृष्ट्या केलेली अजोड बांधणी, तीन माच्या आणि बालेकिल्ला, सुवेळा आणि संजीवनी माचीची देखणी तटबंदी, महाद्वाराची रचना तसेच बुरूजांमध्ये बेमालूमपणे लपवलेली गुप्त प्रवेशद्वारे, चंद्रतळे, पद्मावती आणि राजवाड्याचे तळे, तटात बांधलेले शौचकूप, भागीरथी, जननी, बह्मर्षी, रामेश्वर, पद्मावती अशा दैवतांची मंदिरे असा अवशेषसंपन्न दुर्ग म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या राजगडाची दिवसेंदिवस अधिक दुरवस्था होऊ लागली आहे. रखडलेल्या सदरेसह राजगडाच्या तटबंदीची दुरूस्ती पुरातत्व खात्याने चुकीच्या पद्धतीने केल्याने तटबंदीचे विद्रूपीकरण झाले आहे. संभाव्य जागतिक वारसा स्थळ म्हणून पाहिल्या जाणाऱ्या स्वराज्याच्या या राजधानीचे राजवैभवच लुप्त होण्याचा धोका त्यामुळे निर्माण झाला आहे. ‘गडांचा राजा आणि राजांचा गड’ अशी राजगडाची ख्याती आहे. राजगडावर दुर्ग आणि इतिहास अभ्यासकांसह गिर्यारोहक, वनस्पती आणि वास्तू अभ्यासक तसेच पर्यटकांचा वर्षभर राबता आहे. गडाच्या माच्यांसह कातळी बालेकिल्ला हे मुख्य आकर्षण आहे. स्वराज्याची पहिली राजधानी असलेल्या राजगडावर शिवछत्रपतींचे २५ वर्षे वास्तव्य होते. स्वराज्याच्या इतिहासातील अनेक महत्त्वाच्या घटना आणि घडामोडींचा साक्षीदार असणारा गड म्हणून राजगडाचे महत्त्व वेगळे आहे. या गडाच्या दुरुस्तीबाबत पुरातत्त्व खाते आणि राज्य शासनाने वेगळे धोरण ठेवण्याची गरज असतानाही गडावरच्या कामे चुकीच्या पद्धतीने होत आहेत. मूळ तटबंदी कशी होती हे दर्शविणारा तटबंदीचा भाग पद्मावती मंदिराच्या मागील बाजूस शिल्लक आहे. शिवकालीन बांधकामाचा हा नमुना समोर असूनही राजवाड्याच्या तळ्यापासून पाली दरवाजाकडे जाणाऱ्या तटबंदीवर पुरातत्त्व खात्याने अक्षरक्षः कम्पाउंड वॉलसारखी भिंत बांधली आहे. गेली अनेक वर्षे कधी योग्य ठेकेदार न मिळणे; तर कधी निधीची चणचण अशा दुष्टचक्रात रखडलेले पद्मावती माचीवरील सदरेचे काम यंदा पूर्णत्वास जाण्याची शक्यता होती. मात्र ठेकेदार आणि पुरातत्त्व खाते यांच्यातील वादामुळे हे काम ठप्प झाले आहे. सागवानी लाकडाचा वापर सदरेसाठी करण्यात आला आहे. सदरेच्या छताचेही काम राहिलेले असल्याने आता सागवानी लाकडांच्या तुळया, चौकटी आणि नक्षीदार खांब गडावरच्या धुवांधार पावसात भिजत आहेत. तुळया आणि खांब भिजून ते कुजले की केलेले कामही वाया जाणार आहे. केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या सल्लागार आणि वर्ल्ड हेरिटेज कमिटीच्या सदस्या डॉ. शिखा जैन यांनी राजगड हा वारसा आणि वास्तूसंपन्न गड असल्याची ग्वाही दिली होती. जागतिक वारसास्थळांच्या यादीत हा गड जायलाच हवा, असेही त्यांनी सांगितले होते. या पार्श्वभूमीवर शिल्लक गडावशेषांची वाट लागत असूनही पुरातत्त्व खाते त्याबाबत उदासीन आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rajgad fort
‘राज’वैभव लुप्त होतेय...


मंदिरांमध्ये हॉटेल्स राजगडाच्या पद्मावती माचीवरील पद्मावती आणि रामेश्वर मंदिरांसह महादरावाजातील पहारेकऱ्यांच्या देवड्यांमध्येही सध्या भजी आणि पिठलं-भाकरीची हॉटेल्स स्थानिकांनी सुरू केली आहेत. गडाच्या परीघात रोजगार उपलब्ध होण्यास कोणाचा विरोध नाही मात्र या हॉटेल्समुळे थर्माकोलच्या प्लेट, ग्लास, पाण्याच्या बाटल्या, प्लॅस्टिकच्या पिशव्या असा कचरा प्रचंड वाढला असून तो थेट गडाच्या तटावरून खाली भिरकावला जातो आहे. पुरातत्त्व खात्याचे अधिकारी गडावर फिरकत नसल्याने त्यांना या गोष्टीचे काहीही देणे घेणे नसल्याचे स्पष्ट होत आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज