म. टा. प्रतिनिधी, पुणे
रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन, शनिवारी आरटीओ कार्यालय ते शनिवारवाडा या मार्गावर रॅली काढली. 'हॉर्न'चा अनावश्यक वापर करू नये, सुरक्षित आणि शिस्तपूर्ण वाहतुकीला प्राधान्य द्यावे, अशा आशयाचे रस्ता सुरक्षेचे संदेश देणारे फलक हाती घेऊन, कर्मचाऱ्यांनी रस्ता सुरक्षेचा संदेश दिला. महाराष्ट्र राज्य मोटार वाहन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, सीएएसआय ग्लोबल, सीएसआर डायरी यांच्या एकत्रित प्रयत्नांतून 'रस्ता सुरक्षा जनजागृती'साठी राज्यभरात 'महावॉकेथॉन २०१९'चे आयोजन करण्यात आले होते. या अंतर्गत ही रॅली काढण्यात आली होती.