अ‍ॅपशहर

आठवलेंचा घणाघात, 'राहुल गांधींची भारत जोडो यात्रा नसून भारत तोडो यात्रा, समाजात फूट पाडण्याचे काम'

Rahul Gandhi On Savarkar : काँग्रेस नेते राहुल गांधी हे प्रसिद्धीसाठी वक्तव्य करत असल्याची टीका केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. तसंच स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत वक्तव्य करून समाजात फूट पाडण्याचे काम ते करत आहेत. यामुळे राहुल गांधींची भारत तोडो यात्रा नसून ती भारत तोडो यात्रा आहे, अशी बोचरी टीका रामदास आठवले यांनी केली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Nov 2022, 3:56 pm
पिंपरी, पुणे : राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर ( Rahul Gandhi On Savarkar ) हा वाद करू नये. टीका करून कुणाच्या भावना दुखवू नयेत. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा ( Bharat Jodo Yatra ) करण्यापेक्षा काँग्रेस जोडण्याचे काम करावे. राहुल गांधी यांची ही भारत जोडो नाही तर भारत तोडो यात्रा आहे, असा टोला केंद्रीय मंत्री रामदास आठवले ( Ramdas Athawale ) यांनी राहुल गांधींना लगावला आहे. पिंपरी येथे महाराष्ट्र राज्य परिषदेच्या ४३ व्या अधिवेशनाचे पिंपरीमध्ये उद्घाटन झाले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ramdas athawale on rahul gandhi
आठवलेंचा घणाघात, 'राहुल गांधींची भारत जोडो यात्रा नसून भारत तोडो यात्रा, समाजात फूट पाडण्याचे काम'


वैचारीक मतभेद असू शकतात. पण स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका करून कुणाच्या भावना दुखावण्याची आवश्यकता नाही. एकमेकांवर टीका करून वेगळ्या प्रकारची प्रसिद्धी मिळवण्याचा काहींचा प्रयत्न असतो. त्यामुळे अशा प्रकारची टीका करण्याची कुठलीही गरज नाही. राहुल गांधी यांनी भारत जोडण्यापेक्षा काँग्रेसला बळकट करण्याचं काम करावं. काँग्रेसमध्ये गट पडले आहेत. काँग्रेसची सध्याची अवस्था ना घर का ना घाट का, अशी झाली आहे, असा टोला रामदास आठवले यांनी लगावला आहे.

Rohit Pawar : 'भाजप- शिंदे गटाकडून ठाकरे गटाला अडचणीत आणण्यासाठी सावरकरांचा मुद्दा'

राहुल गांधी यांच्या यात्रेला प्रतिसाद मिळतोय. पण त्याचे मतात परिवर्तन होणार नाही. कारण ही भारत जोडो नाही तर भारत तोडो यात्रा आहे, समाजात तेढ निर्माण करणारी ही यात्रा असल्याची टीका रामदास आठवले यांनी केली. राहुल गांधींच्या या भारत जोडो यात्रेत गर्दी होतेय कारण लोक त्यांना पाहायला येतायत. या यात्रेचा फार काही फायदा होणार नाही. गुजरात निवडणुकीला याचा मोठा फायदा भाजपला होईल. काँग्रेस आणि आपमधील लढाईत भाजपला होऊन भाजपचा गुजरातमध्ये मोठा विजय होऊन सत्तेवर निवडून येईल, असेही आठवले म्हणाले. फक्त गुजरातच नाही तर हिमाचल प्रदेशमध्येही भाजपची सत्ता येईल, अशी परिस्थिती असल्याचा दावा रामदास आठवले यांनी केला. तसेच राज ठाकरे यांच्या बरोबर भाजपच्या युतीला विरोध असल्याचा पुनरूच्चारही आठवले यांनी केला.

देवेंद्र फडणवीसांविरोधात फेसबुक पोस्ट लिहिणं महागात; पुण्यातील तरुणाविरोधात गुन्हा दाखल

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज