म. टा. प्रतिनिधी, पुणे
गुजरातमध्ये नवरात्रौत्सवात रंगणाऱ्या गरबा आणि दांडिया या नृत्यप्रकारांना अनुभवण्याची आणि मित्रमैत्रिणींसह ते मनसोक्त खेळण्याची संधी पुणेकर तरुणांना प्राप्त होणार आहे. 'मटा कल्चर क्लब' आणि 'पीएस इव्हेंट्स'च्या वतीने 'गरबा नाइट'चे आयोजन करण्यात आले असून, या कार्यक्रमात तरुणाईला दांडिया आणि गरब्याचा मनसोक्त आनंद लुटता येणार आहे. येत्या मंगळवारी, १ ऑक्टोबरला सायंकाळी सहा ते रात्री १० या कालावधीत कर्वेनगर येथील दुधाने लॉन्स येथे हा कार्यक्रम रंगणार आहे.
गुजरातप्रमाणेच आता पुण्यातही रास दांडिया आणि गरबा खेळणाऱ्या तरुणांचे प्रमाण वाढत चालले आहे. विशिष्ट ठेक्यावर वाजणाऱ्या गाण्यांवर गरब्यासाठी लागणाऱ्या पारंपरिक वेशात तरुण-तरुणी रास दांडिया खेळतात. 'मटा कल्चर क्लब'तर्फे आयोजित करण्यात आलेल्या 'गरबा नाइट्स'मध्येही अशाच पद्धतीची धमाल करण्याची संधी तरुणांसाठी चालून आली आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी अभिनेत्री अन्वेशी उपस्थित राहणार असून, भारतातील सुप्रसिद्ध डीजे एश्नाच्या गाण्यांवर थिरकण्याची संधी मिळेल. यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या 'मटा कल्चर क्लब'च्या सदस्यांना कार्यक्रमाच्या एका पासवर दुसरा पास मोफत मिळणार आहे. 'कल्चर क्लब'चे नव्याने सदस्यत्व होणाऱ्या नागरिकांनाही एका पासवर दुसरा पास मोफत मिळेल.
पासेस येथे उपलब्ध...
या कार्यक्रमाचे पासेस आज (रविवार) सकाळी १० ते १२ व सायंकाळी ४ ते ६ या वेळेत 'महाराष्ट्र टाइम्स'च्या नामदार गोपाळ कृष्ण गोखले रस्त्यावरील (फर्ग्युसन कॉलेज रस्ता) कार्यालयात मिळणार आहेत. उद्या (सोमवार) सकाळी ११ ते सायंकाळी ६ या वेळेत पासेस उपलब्ध होऊ शकतील. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी प्रवेश मर्यादित असून, प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. अधिक माहितीसाठी ९६५७०३२६०९ या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.
कधी? : मंगळवार, १ ऑक्टोबर
कुठे? : दुधाने लॉन्स, कर्वेनगर
किती वाजता? : सायंकाळी ६ ते रात्री १०