अ‍ॅपशहर

‘दिवे लावल्यास’ स्टिकरचे बंधन

वाहनांवरील लाल आणि अंबर दिवे उतरविल्यानंतर पोलिस, फायर ब्रिगेड आणि आपत्कालीन परिस्थितीत कार्यरत असणाऱ्या वाहनांवरील लाल, निळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या दिव्यांवरही बंधने आली आहेत. या वाहनांवर दिवे लावताना ते दिवे कोणत्या राज्य सरकारने, कोणत्या अधिकाऱ्याला किंवा विभागाला प्रदान केले आणि त्या वाहनाचा नोंदणी क्रमांक, यासंबंधीची माहिती देणारे स्टिकर त्या वाहनांवर लावणे बंधनकारक करण्यात आले आहे.

Kuldeep Jadhav | Maharashtra Times 23 May 2017, 3:00 am
पुणे : वाहनांवरील लाल आणि अंबर दिवे उतरविल्यानंतर पोलिस, फायर ब्रिगेड आणि आपत्कालीन परिस्थितीत कार्यरत असणाऱ्या वाहनांवरील लाल, निळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या दिव्यांवरही बंधने आली आहेत. या वाहनांवर दिवे लावताना ते दिवे कोणत्या राज्य सरकारने, कोणत्या अधिकाऱ्याला किंवा विभागाला प्रदान केले आणि त्या वाहनाचा नोंदणी क्रमांक, यासंबंधीची माहिती देणारे स्टिकर त्या वाहनांवर लावणे बंधनकारक करण्यात आले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम red lamp on vehicles
‘दिवे लावल्यास’ स्टिकरचे बंधन


केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने एप्रिल महिन्यात व्हीआयपी संस्कृती संपविण्यासाठी लाल आणि अंबर दिव्यांच्या वापरावर निर्बंध आणण्याचा निर्णय घेतला होता. त्या वेळी फक्त पोलिस, फायर ब्रिगेड आणि भूकंप, पूर परिस्थिती, भूस्खलन, वादळ व त्सुनामी अशा आपत्कालीन परिस्थितीत मदतकार्यात समाविष्ट असलेल्या वाहनांना लाल, निळा व पांढऱ्या रंगाचा दिवा लावण्याची मुभा दिली होती. मात्र, आता या वाहनांवर दिवा लावल्यानंतर त्याचा गैरवापर होऊ नये, यासाठी रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने त्यावरही नियंत्रण आणले आहे. या दिव्यांसंबंधातील नवीन नियम जाहीर करण्यात आले आहेत.

दिवाधारक वाहनांसाठी आवश्यक स्टिकर उपलब्ध करून देण्याची जबाबदारी प्रत्येक राज्याच्या परिवहन विभागावर सोपविण्यात आली आहे. तसेच, परिवहन विभागाने दर वर्षी दिवा प्रदान केलेल्या वाहनांची यादी जाहीर करावी, अशी सूचनाही करण्यात आली आहे. तसेच, हे वाहन शासकीय सेवेत असतानाच किंवा ज्या विशिष्ट उद्देशासाठी त्या वाहनावर दिवा लावण्यात आला आहे, त्या वेळीच दिव्यांचा वापर करण्याचे बंधन घालण्यात आले आहे.

दिव्यांचा गैरवापर केल्याच्या, कोणत्याही शासकीय पदावर नसताना केवळ मिरवण्यासाठी वाहनांवर दिवा लावण्यात आल्याच्या अनेक घटना यापूर्वी उघडकीस आल्या आहेत. या नवीन नियमानुसार दिवाधारक वाहनांवर स्टिकर नसल्याचे आढळून आल्यास पोलिस किंवा परिवहन विभागाचे अधिकारी अशा वाहनांवर कारवाई करू शकणार आहेत. त्यामुळे या गैरप्रकारांना आळा बसणार आहे.
लेखकाबद्दल
Kuldeep Jadhav

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज