अ‍ॅपशहर

शिष्यवृत्ती परीक्षांचे निकाल जाहीर

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता पाचवी) व पूर्व माध्यमिक (इयत्ता आठवी) या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल गुरुवारी ऑनलाइन जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेतून एकूण १ लाख ५४ हजार ६२२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. इयत्ता पाचवीचा २३.०९ टक्के, तर आठवीचा १२.६४ टक्के निकाल लागला आहे. हा निकाल परिषदेच्या वेबसाइटवर पाहता येईल.

Maharashtra Times 22 Jun 2018, 7:33 am
म. टा. प्रतिनिधी, पुणे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम scholarship

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता पाचवी) व पूर्व माध्यमिक (इयत्ता आठवी) या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल गुरुवारी ऑनलाइन जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेतून एकूण १ लाख ५४ हजार ६२२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. इयत्ता पाचवीचा २३.०९ टक्के, तर आठवीचा १२.६४ टक्के निकाल लागला आहे. हा निकाल परिषदेच्या वेबसाइटवर पाहता येईल.

इयत्ता पाचवीसाठी ४ लाख ८८ हजार ८५० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यांपैकी ४ लाख ७२ हजार ८८४ जणांनी परीक्षा दिली. यातून १ लाख ९ हजार २२५ विद्यार्थी पात्र ठरले, तर ३ लाख ७९ हजार ६२५ विद्यार्थी अपात्र ठरले. पात्र विद्यार्थ्यांपैकी १६ हजार ६९३ जणांना शिष्यवृत्ती मिळेल. इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्तीसाठी ३ लाख ७० हजार २४२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ३ लाख ५८ हजार ९०२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील पात्र विद्यार्थ्यांची संख्या फक्त ४५ हजार ३९७ आहे, तर ३ लाख २४ हजार ८४५ विद्यार्थी अपात्र ठरले आहेत. त्यामुळे पात्र विद्यार्थ्यांपैकी १६ हजार ५८८ जणांना शिष्यवृत्ती मिळेल.

काठीण्य पातळीमुळे कमी विद्यार्थी पात्र

आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालाची टक्केवारी घसरली आहे. या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेची काठीण्य पातळी उच्च होती. त्यातील २० टक्के प्रश्नाच्या उत्तरांचे दोन पर्याय बरोबर होते. त्या दोन्ही पर्यायांसमोरील वर्तुळे शाईने भरायची होती. त्यामुळे प्रश्नांचे काठीण्य वाढले. त्यामुळे आठवीचे कमी विद्यार्थी पात्र ठरले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज