अ‍ॅपशहर

कोंढवा रस्त्याची फेरनिविदा

पालिकेत बहुमताच्या जोरावर ३५ टक्के वाढीव दराने आलेली निविदा मान्य करून कात्रज ते कोंढवा रस्त्याच्या कामाचा सभागृहात मान्य केलेला प्रस्ताव भाजपच्या चांगलाच अंगलट आला आहे. चुकीच्या पद्धतीने सभागृहात मान्य केलेल्या प्रस्तावाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पालकमंत्री गिरीश बापट यांनी पदाधिकाऱ्यांची कडक शब्दात कानउघडणी केली. यामुळे पुन्हा नव्याने संपूर्ण प्रक्रिया करून हा विषय मान्य करण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. या रस्त्याच्या कामाची प्रक्रिया नव्याने राबविण्यात येणार असल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

Maharashtra Times 23 Apr 2017, 4:47 am
वरिष्ठांच्या कानउघडणीनंतर भाजप पदाधिकारी ताळ्यावर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम retender for katraj kondhva road
कोंढवा रस्त्याची फेरनिविदा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पालिकेत बहुमताच्या जोरावर ३५ टक्के वाढीव दराने आलेली निविदा मान्य करून कात्रज ते कोंढवा रस्त्याच्या कामाचा सभागृहात मान्य केलेला प्रस्ताव भाजपच्या चांगलाच अंगलट आला आहे. चुकीच्या पद्धतीने सभागृहात मान्य केलेल्या प्रस्तावाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पालकमंत्री गिरीश बापट यांनी पदाधिकाऱ्यांची कडक शब्दात कानउघडणी केली. यामुळे पुन्हा नव्याने संपूर्ण प्रक्रिया करून हा विषय मान्य करण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. या रस्त्याच्या कामाची प्रक्रिया नव्याने राबविण्यात येणार असल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.
चार महिन्यांपूर्वी जादा दराने निविदा आल्याने अमान्य केलेला कात्रज-कोंढवा रस्त्याचा प्रस्ताव पुन्हा सभागृहात मांडून सत्ताधारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी हा विषय मतदानाने मान्य केला. या प्रस्तावामुळे पुणेकरांचे शंभर कोटींचे नुकसान होणार असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी करून विरोधात मतदान केले होते. या प्रकरणी बापट आणि मुख्यमंत्री फडणवीसांनी लक्ष घातले. पालिकेतील पदाधिकाऱ्यांनी चुकीचा निर्णय घेतल्यामुळे पक्षाची बदनामी होत असल्याचे त्यांनी सुनावले. या पार्श्वभूमीवर मोहोळ यांनी फेरनिविदा काढण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रस्तावाबाबत विरोधक राजकीय आरोप करीत आहेत. या रस्त्याच्या कामासाठी फेरनिविदा मागविण्यात येणार असून, त्यासाठी स्थायीच्या अंदाजपत्रकात तरतूद केली जाणार आहे, असेही मोहोळ म्हणाले.
पालिकेत भाजपची एकहाती सत्ता आल्याने बहुमताच्या जोरावर प्रस्ताव मान्य करण्याचा निर्णय घेतला होता. हडपसरचे आमदार योगेश टिळेकर यांनी प्रस्तावासाठी जोरदार प्रयत्न केले होते. मात्र, या निर्णयामुळे भाजपची बदनामी होत असल्याने पालकमंत्री तसेच मुख्यमंत्र्यांनी पदाधिकाऱ्यांची कानउघडणी केल्यानेच भाजपने एक पाऊल मागे घेतल्याची चर्चा सुरू झाली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज