अ‍ॅपशहर

रिक्षाचालकाने केला बलात्कार

वारजे परिसरात प्रवास करणाऱ्या महिलेवर अंधाराचा फायदा घेऊन रिक्षातच बलात्कार करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यानंतर, संबंधित रिक्षाचालकाने तिला जीवे मारण्याची धमकी देऊन घरी नेऊन पुन्हा बलात्कार केला. चार दिवस घरात डांबून ठेवून मित्रालाही तिच्यावर अत्याचार करण्यास भाग पाडल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी वारजे पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

Maharashtra Times 14 Mar 2017, 6:50 am
जिवे मारण्याची धमकी देऊन स्वतःच्या घरी डांबले
महाराष्ट्र टाइम्स.कॉम riksha driver rape in pune
रिक्षाचालकाने केला बलात्कार


म. टा. प्रतिनिधी, पुणे

वारजे परिसरात प्रवास करणाऱ्या महिलेवर अंधाराचा फायदा घेऊन रिक्षातच बलात्कार करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यानंतर, संबंधित रिक्षाचालकाने तिला जीवे मारण्याची धमकी देऊन घरी नेऊन पुन्हा बलात्कार केला. चार दिवस घरात डांबून ठेवून मित्रालाही तिच्यावर अत्याचार करण्यास भाग पाडल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी वारजे पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

या बाबत ३३ वर्षीय पीडित महिलेने तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार दिलीप अण्णा जाधव (वय ३३, रा. गोकुळनगर, वारजे), संतोष श्यामराव धोत्रे (वय ३०, रा. गोसावी वस्ती, कर्वे नगर) यांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता कोल्हापूरची असून, तिच्या पतीचा पुण्यात व्यवसाय आहे. त्या दोघांमध्ये घटस्फोटाची केस सुरू आहे. त्या कामानिमित्त २४ फेब्रुवारीला ही महिला रात्री पुण्यात आली. कर्वे नगर भागात जाण्यासाठी तिने रिक्षा केली. त्यावेळी जाधव याने महिलेची विचारपूस करून सर्व माहिती दिली. ती पुण्यातील नसल्याचे कळल्यानंतर त्याने कर्वेनगरवरून रिक्षा थेट गोकुळनगर येथील अंधारातील कच्च्या रस्त्याने नेली. त्यानंतर तेथे तिच्यावर बलात्कार केला. तिला ठार मारण्याची धमकी देऊन घरी नेऊन गच्चीवरही तिच्यावर बलात्कार केला. याबाबत कोणाला सांगितले तर खून करेल, अशी धमकीही दिली.

त्यानंतर त्याने पीडितेला चार दिवस घरामध्ये डांबून ठेवले. झालेला प्रकार विसरून जा, माझ्या मित्राला त्याची बायको सोडून गेली आहे, त्याच्यासोबत तुझे लग्न लावून देतो, असे त्याने तिला सांगितले. काही दिवसांनी तो तिला घेऊन धोत्रेच्या घरी गेला. धोत्रेनेही लग्नाची तयारी दर्शवून तिच्यावर दोन ते सहा मार्च दरम्यान बलात्कार केला. ही महिला कोल्हापूरला परतल्यानंतर धक्क्यातच होती. कुटुंबीयांनी चौकशी केल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला. त्यानंतर महिलेने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल दोघांना अटक केली. त्याना कोर्टाने १८ मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज