अ‍ॅपशहर

नदीसंवर्धनाचा प्रारंभ बाणेर-बालेवाडीतून

मुळा-मुठा नदीसंवर्धन प्रकल्पाच्या कामास ‘स्मार्ट सिटी’साठी निवडण्यात आलेल्या बाणेर-बालेवाडीतून सुरुवात होणार आहे. बाणेर-बालेवाडीच्या सांडपाणी वाहिनीचे काम करण्यास केंद्र सरकारने पालिकेला परवानगी दिली असून, पुढील आठवड्यात या कामाच्या निविदा उघडल्या जाणार आहेत. निविदा उघडल्यानंतर महिनाभरात काम सुरू होईल, अशी माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.

Maharashtra Times 22 Sep 2017, 4:44 am
सांडपाणी वाहिनीस केंद्राची परवानगी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम river protection programme starts from baner balewadi
नदीसंवर्धनाचा प्रारंभ बाणेर-बालेवाडीतून


म. टा. प्रतिनिधी, पुणे

मुळा-मुठा नदीसंवर्धन प्रकल्पाच्या कामास ‘स्मार्ट सिटी’साठी निवडण्यात आलेल्या बाणेर-बालेवाडीतून सुरुवात होणार आहे. बाणेर-बालेवाडीच्या सांडपाणी वाहिनीचे काम करण्यास केंद्र सरकारने पालिकेला परवानगी दिली असून, पुढील आठवड्यात या कामाच्या निविदा उघडल्या जाणार आहेत. निविदा उघडल्यानंतर महिनाभरात काम सुरू होईल, अशी माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.
मुळा-मुठा नदी संवर्धन प्रकल्पाच्या कामास केंद्र सरकारने जपानच्या ‘जायका’ कंपनीकडून कर्ज उपलब्ध करण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ९९० कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, त्यातील ८५ टक्के निधी हा केंद्राकडून मिळणार आहे. उर्वरित १५ टक्के निधी महापालिकेला द्यावा लागणार आहे. ही योजना मंजूर होऊन २० महिने लोटले तरी प्रत्यक्ष कामास सुरूवात झालेली नाही. या कामासाठी सल्लागार नेमण्याची प्रक्रिया पूर्ण न झाल्याने पालिकेने त्यावर तोडगा काढला होता.
सल्लागाराची नेमणूक होईपर्यंत बाणेर-बालेवाडी येथील सांडपाण्याचे काम करण्यास परवानगी​ मिळण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा केला होता. पालिकेच्या या प्रयत्नांना यश आले असून केंद्राने परवानगी दिली आहे. त्यानुसार पुढील आठवड्यात निविदा उघडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.
सांडपाणी मोठ्या प्रमाणात नदीपात्रात सोडण्यात येत असल्याने नद्यांच्या अ​स्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर मुळा-मुठा नदी संवर्धन प्रकल्पाची कामे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारने या कामासाठी जपानमधील ‘जायका’ कंपनीच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून दिले आहे. ही प्रक्रिया गेल्यावर्षी जानेवारी २०१६ मध्ये झाली होती. त्यानंतर या प्रकल्पासाठी २६ कोटी रुपयांचा निधी पालिकेकडे वर्गही करण्यात आला होता. मात्र, या योजनेसाठी सल्लागार नेमला नसल्याने प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली नव्हती.
स्मार्ट सिटी योजनेंतर्गंत क्षे​त्र निहाय विकासासाठी औंध-बाणेर-बालेवाडीची निवड करण्यात आली आहे. त्यानुसार या भागातील ६० किलोमीटर लांबीच्या सांडपाण्याच्या लाईन टाकण्याच्या कामाची गरज व्यक्त करण्यात आली होती. केंद्र सरकारने त्यास मान्यता दिल्यानंतर निविदी प्रक्रिया राबविण्यात आली होती. या निविदा पुढील आठवड्यात उघडल्या जाणार आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज