अ‍ॅपशहर

‘रोटी डे’ला वाढता पाठिंबा

व्हॅलेंटाइन डेला अभिनेता अमित कल्याणकर आणि त्याचा एक मित्र फर्ग्युसन रोडवर भटकत असताना त्यांना विशीतला एक गरीब मुलगा मोठ्या कष्टाने स्वयंपाक करताना दिसला. एकीकडे सेलिब्रेशन आणि दुसरीकडे खाण्याविषयी उदासिनता असे विरुद्ध चित्र पाहून अमित सुन्न झाला. त्याच रात्री त्याला ‘काश कोई ‘रोटी डे’ भी होता,’अशा आशयाच्या व्हॉट्स-अॅप मेसेज आला आणि त्याने ही कल्पना उचलून धरली. आपल्या कलाकार मित्रांच्या सोबतीने १ मार्च हा ‘रोटी डे’म्हणून ठरवला. त्याला आता केवळ पुण्यातूनच नाही, तर मुंबई, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर या शहरांतूनही सहभागाचा पाठिंबा मिळाला आहे.

Maharashtra Times 27 Feb 2016, 3:00 am
पुण्यासह पाच शहरांमध्ये येत्या १ मार्चला गरजूंना देणार पोळ्या
महाराष्ट्र टाइम्स.कॉम roti day amit kalyankar
‘रोटी डे’ला वाढता पाठिंबा

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘व्हॅलेंटाइन डे’ला अभिनेता अमित कल्याणकर आणि त्याचा एक मित्र फर्ग्युसन रोडवर भटकत असताना त्यांना विशीतला एक गरीब मुलगा मोठ्या कष्टाने स्वयंपाक करताना दिसला. एकीकडे सेलिब्रेशन आणि दुसरीकडे खाण्याविषयी उदासिनता असे विरुद्ध चित्र पाहून अमित सुन्न झाला. त्याच रात्री त्याला ‘काश कोई ‘रोटी डे’ भी होता,’ अशा आशयाच्या व्हॉट्स-अॅप मेसेज आला आणि त्याने ही कल्पना उचलून धरली. आपल्या कलाकार मित्रांच्या सोबतीने १ मार्च हा ‘रोटी डे’ म्हणून ठरवला. त्याला आता केवळ पुण्यातूनच नाही, तर मुंबई, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर या शहरांतूनही सहभागाचा पाठिंबा मिळाला आहे.
येत्या १ मार्चला कलाकारांसहित अनेक सामान्य नागरिक आपापल्या परीने घरी पोळ्या/रोटी/ चपाती बनवून गरजूंना देणार आहेत. इतरांनी तयार केलेल्या चपात्या गरजूंपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी अमितने उचललेली नाही, तर जे त्या तयार करतील, तेच
प्रत्यक्ष पोहोचवण्याची भूमिका बजावतील, अशी या ‘रोटी डे’ मागची कल्पना आहे. अमितच्या ‘रोटी डे’च्या कल्पनेला डिझायनर सुरेश बोर्डेने अंतर्मुख करणाऱ्या अशा पोश्टरचे रूप देऊन व्हायरल केले आहे.
अमितसोबत नेहा गद्रे, मैथिली पानसे-जोशी, विनोद खेडेकर, प्राजक्ता, जगन्नाथ नवंगुणे, अमित शेरखाणे, आस्ताद काळे, अमित फाटक, चेतन चावडा आदी कलाकार जोडले गेले आहेत. त्यांनी ‘रोटी डे’मध्ये सहभाग नोंदवला आहेच; त्याशिवाय ही कल्पना सोशल मीडियाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंतही पोहोचवली आहे. ‘समर्थ अॅकॅडमी’ नाट्यसंस्थेतील कलाकारांचाही त्याला पाठिंबा आहे.
‘व्हॅलेंटाइन डे’च्या दुसऱ्या दिवशी पुन्हा फर्ग्युसन रोडवर गेलो असता, तिथे मला तो मुलगा दिसला नाही. त्याने काही खाल्ले असेल का या प्रश्नांने मला अस्वस्थ केले. तो जिथे कुठे असेल तिथे त्याचे पोट भरता येईल याचा एक मार्ग ‘रोटी डे’मुळे मला सापडलाय. यामुळे कुठलाच गरजू उपाशी राहणार नाही,’ असे अमितने नमूद केले.
‘शक्य होईल तितक्या पोळ्या बनवून तुम्ही राहत असलेल्या भागातील गरजूंना द्या. सोसायटीचा वॉचमन, हॉस्टेलवर राहणारी मुले, दवाखान्यात बाहेरून आलेले पेशंट, अनाथाश्रम, वृद्धाश्रम इत्यादी ठिकाणी एक-दोन दिवस आधी संपर्क साधूनही तुम्ही पोळ्या द्या,’ असे आवाहन अमितने केले आहे.
...
सध्या रोटी डे पाच शहरांमध्ये होतो आहे. मात्र, जास्तीत जास्त लोकांनी यामध्ये सहभाग नोंदवला, तर १ मार्च हा राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरचा ‘रोटी डे’ नक्कीच होऊ शकतो.
- अमित कल्याणकर

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज