अ‍ॅपशहर

एजंटांचा सुळसुळाट

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने विविध पदांची भरती प्रक्रिया सुरू केली आहे. त्या अनुषंगाने चालक कम वाहक पदांसाठी आवश्यक असणारे परवाने व बॅच बिल्ला काढण्यासाठी उमेदवारांची धावपळ होत आहे. मात्र, आरटीओ कार्यालयातील एजंटांनी या संधीचा लाभ घेऊन उमेदवारांची लूट सुरू केली. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

Maharashtra Times 13 Jan 2017, 10:22 pm
एसटी भरतीसाठी आलेल्या उमेदवांची आरटीओमध्ये लूट; प्रशासनाचे दुर्लक्ष
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rto agent in baramati
एजंटांचा सुळसुळाट

म. टा. प्रतिनिधी बारामती
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने विविध पदांची भरती प्रक्रिया सुरू केली आहे. त्या अनुषंगाने चालक कम वाहक पदांसाठी आवश्यक असणारे परवाने व बॅच बिल्ला काढण्यासाठी उमेदवारांची धावपळ होत आहे. मात्र, आरटीओ कार्यालयातील एजंटांनी या संधीचा लाभ घेऊन उमेदवारांची लूट सुरू केली. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
एसटीच्या भरतीमध्ये चालक कम वाहक पदांसाठी उमेदवारांना विविध परवाने असणे बंधनकारक आहे. ते घेण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांनी व स्वतः उमेदवारांनी बारामतीतील आरटीओ कार्यालयात गर्दी केली आहे. परवान्यासंबंधी माहिती घेण्यासाठी गेल्यानंतर कार्यालयातील कर्मचारी माहिती देतात. मात्र, संबंधित माहिती देणारा कर्मचारी अन्य कामात व्यस्त असल्याचा फायदा घेऊन एजंट खिडकीजवळ उभे असलेल्या नागरिकांना/उमेदवाराला बोलून घेत ‘तुझे काम अर्जंट करून देतो’ असे म्हणून त्यांची आर्थिक फसवणूक करीत असल्याचे ‘मटा’च्या पाहणीतून दिसून आले.
चालक डबल परवाना व बॅच बिल्ला यासाठी शासकीय शुल्क ९६५ रुपये असून वाहकासाठी परवाना व बॅच बिल्ल्यासाठी ३२५ रुपये अधिकृत खर्च असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, आरटीओ कार्यालयातील एजंट संबंधित उमेदवाराकडून वाहकासाठी एक हजार रुपये तर चालकासाठी पाच हजार रुपये घेत असल्याचे ‘मटा’च्या सर्वेक्षणात दिसून आले.
-----------
कोणत्याही कामाची कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी यांच्याकडूनच माहिती घ्यावी. कार्यालयात सर्व माहिती पुरवली जाते व वेळेत सर्वांचे काम करण्यात येते. कार्यालयात प्रत्येक शुल्क घेतल्यानंतर त्याची पावती दिली जाते.
- अनिल वळीव, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, बारामती
------------
मी बाबुर्डी येथून आलो. माझ्या मित्राकडे एक हजार रुपये नव्हते, म्हणून आम्ही थेट कार्यालयामार्फत काम केल्याने त्याचे काम झाले व पैसे वाचले.
- दिनकर थोरात, इच्छुक उमेदवार

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज