अ‍ॅपशहर

​ ‘आरटीओ चार्जेस’च्या नावाखाली लुबाडणूक

नवीन वाहनांची नोंदणी करण्यासाठी वाहन वितरक ‘आरटीओ चार्जेस’च्या नावाखाली ग्राहकांकडून दोन ते पाच हजार रुपये बेकायदा उकळत असल्याचे समोर आले आहे. परिवहन कार्यालयाच्या नियमांनुसार ग्राहकांकडून केवळ मोटार वाहन कर व रस्ता सुरक्षा अधिभार आदी नोंदणी शुल्क भरणे अपेक्षित असताना अनेक वितरक ग्राहकांकडून दोन ते पाच हजार रुपयांपर्यंत अतिरिक्त रक्कम घेत असल्याचे दिसून आले आहे.

Maharashtra Times 11 Oct 2017, 6:33 pm
‘आरटीओ चार्जेस’च्या नावाखाली लुबाडणूक
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rto charges across multiple
​ ‘आरटीओ चार्जेस’च्या नावाखाली लुबाडणूक


कुलदिप जाधव
पुणे : नवीन वाहनांची नोंदणी करण्यासाठी वाहन वितरक ‘आरटीओ चार्जेस’च्या नावाखाली ग्राहकांकडून दोन ते पाच हजार रुपये बेकायदा उकळत असल्याचे समोर आले आहे. परिवहन कार्यालयाच्या नियमांनुसार ग्राहकांकडून केवळ मोटार वाहन कर व रस्ता सुरक्षा अधिभार आदी नोंदणी शुल्क भरणे अपेक्षित असताना अनेक वितरक ग्राहकांकडून दोन ते पाच हजार रुपयांपर्यंत अतिरिक्त रक्कम घेत असल्याचे दिसून आले आहे.

प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे वाहन नोंदणी करताना मोटार वाहन कर व त्यावर दोन टक्के रस्ता सुरक्षा अधिभार द्यावा लागतो. ही प्रक्रिया वाहन वितरकांकडून केली जाते. त्यावेळी वितरक ग्राहकांकडून ‘आरटीओ चार्जेस’च्या नावाखाली अधिक रक्कम शुल्क वसूल करतात. चारचाकी वाहनांच्या पाच वितरकांकडे ‘मटा’ प्रतिनिधीने ग्राहक म्हणून चौकशी करून कोटेशन जमा केली, तेव्हा त्यामध्ये ‘आरटीओ चार्जेस’ आणि ‘आरटीओ टॅक्स’ अंतर्गत दोन ते पाच हजार रुपयांपर्यंत अतिरिक्त रक्कम वसूल केले जात असल्याचे स्पष्ट झाले.

काही वितरकांनी ‘कोटेशन’मध्ये ‘आरटीओ चार्जेस’ असा उल्लेख केलेला नाही. मात्र,‘आरटीओ टॅक्स’ अंतर्गत ही रक्कम वसूल केली असल्याचे दिसून आले. पेट्रोलवर चालणाऱ्या चारचाकी गाड्यांसाठी ११ ते १३ टक्के, डिझेलवरील वाहनांसाठी १३ ते १५ टक्के आणि सीएनजी किंवा एलपीजीवरील वाहनांसाठी सात ते नऊ टक्के कर आकारला जातो. (क्रमशः)

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज