अ‍ॅपशहर

सॅलिसबरी पार्क येथे ३५ लाखांची घरफोडी

शहरात बंद घरे फोडण्याचा सपाटा सुरूच सॅलिसबरी पार्क परिसरातील एका डॉक्टरच्या बंगल्यात घरफोडी करून चोरट्यांनी तब्बल एक किलो सोन्याच्या दागिन्यांसह ३५ लाख ५६ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याचा प्रकार रविवारी उघडकीस आला. या प्रकरणी मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Maharashtra Times 3 Oct 2017, 3:00 am
पुणे : शहरात बंद घरे फोडण्याचा सपाटा सुरूच सॅलिसबरी पार्क परिसरातील एका डॉक्टरच्या बंगल्यात घरफोडी करून चोरट्यांनी तब्बल एक किलो सोन्याच्या दागिन्यांसह ३५ लाख ५६ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याचा प्रकार रविवारी उघडकीस आला. या प्रकरणी मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम salisbury park dacoity
सॅलिसबरी पार्क येथे ३५ लाखांची घरफोडी

याबाबत गौरव प्रवीण चोरडिया (वय २७, रा. सॅलिसबरी पार्क) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण चोरडिया हे डॉक्टर आहेत. ‘प्रविण मसाले’ कंपनीच्या मालकांचे ते बंधू आहेत. सॅलिसबरी पार्क येथील विद्यासागर कॉलनीमध्ये चोरडिया यांचा बंगला आहे. ३० ऑक्टोबर रोजी घरातील सर्व जण लोणावळा येथे गेले होते. एक ऑक्टोबर रोजी सकाळी ते घरी आले. त्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे आढळून आले. घटनेची माहिती मिळताच मार्केटयार्ड व गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. एका कपाटातील तिजोरी आरोपींनी बाहेर काढली होती; पण त्यांना ती उघडता आली नाही. दुसऱ्या कपाटातील ऐवज व तिजोरी घेऊन चोरटे पळून गेले. यामध्ये १०६ तोळे सोन्याचे दागिने, नऊ हिऱ्यांचे सेट असा एकूण ३५ लाख ५६ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले. बंगल्याच्या गच्चीवरचे दार उघडे राहिले होते. ‌तिथून चोरट्यांनी प्रवेश केला असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणी पोलिस निरीक्षक (गुन्हे) देशमुख तपास करत आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज