अ‍ॅपशहर

‘सनातनवरील बंदीसाठीसर्वांनी पुढाकार घ्यावा’

एरवी छोट्या-मोठ्या गोष्टींवर 'ट्विट' करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांना अटक करणाऱ्या दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीएस) साधे अभिनंदनही केले नाही. त्यामुळे दाभोलकर यांची हत्या करणाऱ्या शक्तींना युती सरकारचा पाठिंबा आहे, असे आम्ही समजायचे का असा प्रश्न उपस्थित करून विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सनातन संस्थेवर बंदी घालण्यासाठी सर्वच घटकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे.

Maharashtra Times 20 Sep 2018, 2:12 am
पुणे : एरवी छोट्या-मोठ्या गोष्टींवर 'ट्विट' करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांना अटक करणाऱ्या दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीएस) साधे अभिनंदनही केले नाही. त्यामुळे दाभोलकर यांची हत्या करणाऱ्या शक्तींना युती सरकारचा पाठिंबा आहे, असे आम्ही समजायचे का असा प्रश्न उपस्थित करून विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सनातन संस्थेवर बंदी घालण्यासाठी सर्वच घटकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sanatan ban all should take initiative appeal by radha krishna vikhe patil
‘सनातनवरील बंदीसाठीसर्वांनी पुढाकार घ्यावा’


पुणे पत्रकार प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित कै. वि. श्री. जोगळेकर शोधनिबंध स्पर्धेतील विजेत्या पत्रकारांना पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आले. या प्रसंगी पुणे पत्रकार प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र बडदे, विठ्ठल जाधव, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, मोहन जोशी, परीक्षक प्रा. प्रकाश पवार, अॅड. अभय छाजेड, पालिकेतील गटनेते अरविंद शिंदे, गोपाळ तिवारी, सदानंद शेट्टी आदी उपस्थित होते. शोधनिबंध स्पर्धेत दीपक कांबळे, राजेशा मकानदार, हनुमंत पवार, स्वप्नील बापट आणि सुनीत भावे यांना गौरविण्यात आले. सनातन संस्थेसारख्या कट्टरवादी संस्थाच्या कारवाया समाजासाठी घातक बनल्या आहेत. दाभोलकरांचे मारेकरी सचिन अंदुरे, शरद कळसकरसारख्या तरुणांचे ब्रेनवॉश करण्यात येत आहेत, अशी टिप्पणीही विखे पाटील यांनी केली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज