अ‍ॅपशहर

शिवसैनिक फक्त आदेशाची वाट बघत आहेत; शिंदेंसह बंडखोर आमदारांना राऊतांचा इशारा

Sanjay Raut on Eknath Shinde : एकनाथ शिंदे आणि शिवसेना नेतृत्वातील संघर्ष आणखी टोकदार होण्याची शक्यता आहे. कारण संजय राऊत यांनी बंडखोर गटाला आक्रमक इशारा दिला आहे.

Authored byअक्षय शितोळे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Jun 2022, 11:22 am
मुंबई : आमदारांनी केलेल्या बंडाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आज महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. या बैठकीआधी पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांवर निशाणा साधला आहे. 'शिवसेना हा पक्ष शिवसैनिकांच्या रक्त आणि घामातून उभा राहिला आहे. त्यामुळे कोणाकडे जास्त पैसे आहेत म्हणून हा पक्ष हायजॅक केला जाऊ शकत नाही,' असा हल्लाबोल राऊत यांनी केला आहे.

'शिवसेनेच्या आजच्या बैठकीत पक्षाचं वर्तमान आणि भविष्य याबाबत महत्त्वाचे निर्णय होतील. लाखो शिवसैनिक आहेत म्हणून मी शिवसेनाप्रमुख आहे, असं दिवंगत बाळासाहेब ठाकरे हे नेहमी सांगायचे. हेच शिवसैनिक आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी ठामपणे उभे आहेत. मुंबईत शिवसैनिकांची रीघ लागली आहे. हे शिवसैनिक आता फक्त आदेशाची वाट बघत आहेत,' असं म्हणत संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोरी केलेल्या शिवसेनेच्या इतर आमदारांना आक्रमक इशारा दिला आहे.
लेखकाबद्दल
अक्षय शितोळे
अक्षय शितोळे, २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज