सॅनिटायझर प्यायलामुळे
जिंतीमध्ये तिघांचा मृत्यू
साताराः लॉकडाउनच्या काळात दारुविक्री बंद असल्यामुळे फलटण तालुक्यातील जिंती येथील तीन जणांनी सॅनिटायझर प्यायल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. सॅनिटायझर प्यायल्यामुळे त्यांना उलटी आणि चक्कर यासारखा त्रास लागला. त्यामध्ये तिघांचा मृत्यू झाला. किरण सावंत, दीपक जाधव आणि अशोक रणवरे अशी त्यांची नावे आहेत.