परभणी : येथील सानेगुरुजी सार्वजनिक वाचनालयाचे ग्रंथपाल सतीश टाकळकर यांना ग्रंथालय क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठीचा महाराष्ट्र सरकारचा सन २०१६-१७ या वर्षीचा डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय सेवक व ग्रंथमित्र हा विभागस्तरीय पुरस्कार सांस्कृतिक कार्य, संसदीय कार्य मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी विधानपरिषद सदस्य हरिभाऊ राठोड, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे उपसचिव कहार, ग्रंथालय संचालक सुभाष राठोड, कक्ष अधिकारी अनिल सावरे, राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ. रामेश्वर पवार, अनिल बोरगमवार यांची उपस्थिती होती.
ग्रंथमित्र पुरस्काराने सतीश टाकळकर सन्मानित
येथील सानेगुरुजी सार्वजनिक वाचनालयाचे ग्रंथपाल सतीश टाकळकर यांना ग्रंथालय क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठीचा महाराष्ट्र सरकारचा सन २०१६-१७ या वर्षीचा ...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 16 Sep 2019, 4:00 am