अ‍ॅपशहर

...तर मग आम्हीही होणार 'पदवीधर'!

Education : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात १२ हजार शिक्षण सोडलेल्यांनी पदवीसाठी अर्ज दाखल केले आहेत. या अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाच्या प्रवाहाच्या बाहेर गेलेले २०१४ मधील विद्यार्थीही आहेत.

महाराष्ट्र टाइम्स 9 Jul 2020, 7:26 am
Harsh.Dudhe@timesgoup.com
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ...तर मग आम्हालाही पदवी हवी!

Tweet : @HarshDudheMT


पुणे : अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करून मागील परीक्षांच्या आधारे गुण देण्याच्या राज्य सरकारच्या धोरणाचा फायदा घेण्यासाठी गेल्या सात-आठ वर्षांत शिक्षण सोडलेले अनुत्तीर्ण विद्यार्थीही सरसावले आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडे अशा बारा हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी पदवीसाठी अर्ज भरले आहेत. या अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाच्या प्रवाहाच्या बाहेर गेलेले २०१४ मधील विद्यार्थीही आहेत.

विद्यापीठांच्या विविध अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नव्हते. त्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने परीक्षेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. त्यानंतर विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांसाठी दोन लाख २६ हजार १८८ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. राज्य सरकारने १९ जून रोजी अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून विद्यापीठांने पुन्हा विद्यार्थ्यांना २५ जूनपर्यंत अर्ज करण्याची संधी दिली. या संधीचा विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी पुरेपूर फायदा उचलला आहे. या विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक आणि बिगरव्यावसायिक अभ्यासक्रमांचा सामावेश आहे.

अर्ज भरण्याच्या या वाढीव मुदतीत १२ हजार २०० विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले आहेत. यातील अनेक विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहापासून बाहेर गेलेले आहे. तर, अनेकांनी शिक्षण सोडून दिले आहे. मात्र, परीक्षा न देता उत्तीर्ण होऊन पदवी मिळणार असल्याच्या आशेने या विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. साधारण २०१५ पासूनचे किंवा त्यापूर्वीचेही विद्यार्थी असल्याचे विद्यापीठ प्रशासनाने सांगितले आहे. सरकारच्या निर्णयाचा फायदा घेण्यासाठी जुने विद्यार्थी जागे झाले असून, केवळ पदवी मिळते म्हणून अर्ज केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

'बॅकलॉग' विद्यार्थी अधिक


सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अंतिम वर्षाला असणाऱ्या एक लाख ३६ हजार ९० विद्यार्थ्यांचे विषय बॅकलॉग आहेत, तर त्यापेक्षा कमी म्हणजे ९० हजार ९८ विद्यार्थी हे इतर सत्रांत उत्तीर्ण आहेत. त्यामुळे विद्यापीठात उत्तीर्ण विद्यार्थ्यांपेक्षा बॅकलॉग विषय असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक असल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे.

विद्याशाखा - एटीकेटी/ बॅकलॉग - उत्तीर्ण - एकूण

बिगर व्यावसायिक - ६४५७१ - ४४०६८ - १०८६३९

व्यावसायिक
- ७१५१९ - ४६०३० - ११७५४९

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज