अ‍ॅपशहर

प्रश्न विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा

स्कूल बस आणि स्कूल व्हॅनमधून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकडे शालेय प्रशासन, परिवहन विभाग आणि वाहतूक पोलिस सर्रास दुर्लक्ष करीत असून शहरातील हजारो विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Maharashtra Times 30 Jun 2016, 3:00 am
स्कूल व्हॅन, बसकडून नियमांची पायमल्ली सुरूच
महाराष्ट्र टाइम्स.कॉम school buses in pune are not following ruls
प्रश्न विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा

म. टा. प्रतिनिधी, पुणे
स्कूल बस आणि स्कूल व्हॅनमधून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकडे शालेय प्रशासन, परिवहन विभाग आणि वाहतूक पोलिस सर्रास दुर्लक्ष करीत असून शहरातील हजारो विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पुणे व पिंपरी चिंचवड परिसरात बस आणि व्हॅन वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करत रस्त्यांवर धावत आहेत. राज्य सरकारच्या आदेशानुसार शालेय वाहतुकीची जबाबदारी ही परिवहन विभागासोबतच संबंधित शाळांची आहे. मात्र, शाळेच्या प्रशासनाकडून सरकारच्या आदेशाला ‘खो’ देण्याचेच काम सुरू आहे.
पुणे व पिंपरी चिंचवड परिसरातील बहुसंख्य शाळांचे विद्यार्थी हे स्कूल बस आणि स्कूल व्हॅनमधून ये-जा करतात. परिवहन विभागाने या विद्यार्थ्यांची शालेय वाहतूक करण्याबाबत नियमावली केली आहे. ही वाहतूक सुरळीत होण्यासाठी प्रत्येक शाळेत परिवहन समिती स्थापन करण्यात आली आहे. मात्र, या समित्यांच्या शाळांमध्ये बैठकाच होत नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने काही महिन्यांपूर्वी शाळांना आणि परिवहन विभागाला या बैठका घेण्याचे आदेश दिले होते. तसेच कोर्टाने विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन मे महिन्यात स्कूल बस आणि स्कूल व्हॅनची तपासणी करण्याचे आदेश दिले होते. मात्र, अद्याप तपासणी मोहीम सुरूच आहे.
शहरातील बहुतांशी स्कूल बस आणि स्कूल व्हॅनमध्ये मदतनीस नाही, अग्निशमन यंत्रणा नाही, प्रथमोपचार पेटी नाही, परिवहन विभागाचे वाहतूक करण्याबाबतचे योग्यता प्रमाणपत्र नाही. ही वाहने वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करतात, असे असताना देखील या वाहनांवर परिवहन विभाग आणि वाहतूक पोलिस कारवाई करीत नसल्याचेच चित्र आहे. या वाहतुकीच्या संदर्भात शालेय प्रशासनाने सपशेल दुर्लक्ष केल्याचे आढळून आले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज