अ‍ॅपशहर

​शरद जोशी यांच्या चरित्राचे आज प्रकाशन

शेतकऱ्यांचे पंचप्राण, योद्धा शेतकरी शरद जोशी यांचे कार्य त्यांच्या चरित्रातून सर्वांसमोर येत आहे. भानू काळेलिखित ‘अंगारवाटा... शोध शरद जोशींचा’ या चरित्राचे प्रकाशन आज (सोमवारी) पुण्यात होणार आहे.

Maharashtra Times 5 Dec 2016, 3:00 am
पुणे : शेतकऱ्यांचे पंचप्राण, योद्धा शेतकरी शरद जोशी यांचे कार्य त्यांच्या चरित्रातून सर्वांसमोर येत आहे. भानू काळेलिखित ‘अंगारवाटा... शोध शरद जोशींचा’ या चरित्राचे प्रकाशन आज (सोमवारी) पुण्यात होणार आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sharad joshi
​शरद जोशी यांच्या चरित्राचे आज प्रकाशन

शरद जोशी यांच्या इच्छेनुसार त्यांच्या हयातीतच या चरित्रलेखनाचे काम सुरू झाले होते. जोशी यांनी ही जबाबदारी ‘अंतर्नाद’चे संपादक भानू काळे यांच्यावर सोपविली होती. शेतकरी संघटना न्यास आणि ऊर्मी प्रकाशन प्रकाशित या चरित्रात एकूण ५१२ पानांचा मजकूर व २४ पानी फोटोंचा समावेश आहे. पाचशे रुपये किमतीचे हे पुस्तक प्रकाशनानिमित्त खास सवलतीत उपलब्ध असेल.
सोमवारी सायंकाळी पाच वाजता नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात भारतीय जनता पक्षाचे खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्या हस्ते या चरित्राचे प्रकाशन होईल. ज्येष्ठ विचारवंत डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. किसान समन्वय समितीचे अध्यक्ष व माजी खासदार सरदार भूपिंदर सिंग मान, डॉ. सदानंद मोरे आदी उपस्थित राहतील, अशी माहिती चरित्र लेखन प्रकल्पाचे समन्वयक बद्रीनाथ देवकर यांनी दिली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज