अ‍ॅपशहर

शरद पवार रात्री ११ वाजता पोहोचले MPSC विद्यार्थी आंदोलनात, सीएम शिंदेना केला फोन, मुख्यमंत्र्यांनी दिला शब्द

Sharad Pawar met MPSC students : पुण्यात गेल्या दोन दिवसांपासून एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी या विद्यार्थ्यांची भेट घेतली.

Authored byसुनील तांबे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Feb 2023, 6:28 pm
पुणे : पुण्यात गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. ही परीक्षा नव्या अभ्यासक्रमानुसार न घेता ती जुन्या अभ्यासक्रमानुसार घेण्यात यावी, अशी या विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी आहे. या आंदोनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार रात्री ११ वाजण्याच्या सुमारास दाखल दाखल झाले. त्यावेळी त्यांनी थेट मुख्यमंत्री शिंदे यांना फोन केला. विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करण्यात येणार असून दोन दिवसांत आपण बैठक घेऊ असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्याचे पवार यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी हे आश्वासन दिले असले तरी अधिकृत भूमिका येत नाही तो पर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील असे आंदोलक विद्यार्थ्यांनी सांगितले.

शिवसेनेच्या पहिल्या कार्यकारिणी बैठकीत मोठे निर्णय, एकनाथ शिंदे पक्षाचे मुख्य नेते, सिद्धेश कदम सचिवपदी
यावेळी संवाद साधताना शरद पवार यांनी राहुरी विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या पत्राचा उल्लेख केला. ते म्हणाले की, 'एका विद्यापीठाचे कुलगुरू मला काल भेटायला आले होते. एमपीएससीच्या अभ्यासक्रमामध्ये बदल केला गेल्याची माहिती त्यांनी मला दिली. तसेच विद्यार्थ्यांच्या मागण्या रास्त असल्याचे त्यांनी मला सांगितले. महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठातील विद्यार्थी हे याच्याविरोधात गेल्या २६ दिवसांपासून आंदोलन करत असून याचा परिणाम विद्यापीठाच्या कामावर होत असल्याचे ते म्हणाले. या विद्यार्थ्यांच्या मागण्या योग्य असल्याकारणाने आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची या प्रकरणी भेट घेऊन एक बैठक घ्या, असी विनंती करणारे एक लेखी निवेदनही त्यांनी मला दिलं.'

कल्याणमध्ये अ‍ॅसिडहल्ला; धावत्या कारमधून चेहऱ्यावर फेकले ॲसिड, पादचारी गंभीररित्या भाजला
मुख्यमंत्र्यांनी बैठक घेण्याचं कबूल केलं आहे- पवार

पवार पुढे म्हणाले की, 'या प्रकरणी मी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांची मागणी मान्य करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी मला दिलं असून येत्या दोन दिवसात यासंबंधी एक बैठक घेण्याचंही त्यांनी कबूल केलं आहे.'

दरम्यान, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी आंदोलकर्त्या ५ विद्यार्थ्यांचं एक शिष्टमंडळ पवार यांच्या नेतृत्त्वात जाणार आहे. या आंदोलनात या शिष्टमंडळात कोण असेल याची नावेही जाहीर करण्यात आली आहेत.

माझ्या मोबाइलचा रिचार्ज संपला, करून द्या; दिव्यांग बांधवाचा थेट बच्चू कडूंना फोन, कडूंनी काय केले पाहा
अशा आहेत विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या

> एमपीएससीच्या मुख्य परीक्षेसाठी लागू करण्यात आलेला नवा अभ्यासक्रम सन २०२५ पासून लागू करावा.
> नवा पॅटर्न लागू करण्याची घाई करु नये.
> परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मुलांना किमान ५ ते ६ महिने वेळ मिळावा.
> नवा अभ्यासक्रम यूपीएससीच्या (UPSC) अभ्यासक्रमाप्रमाणे आहे. या अभ्यासक्रमाची पुस्तके मराठीतून उपलब्ध नाहीत, त्यामुळे त्यात सुधारणा करण्यात यावी .
लेखकाबद्दल
सुनील तांबे
सुनील तांबे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी सी न्यूज, ईटीव्ही मराठी वृत्तवाहिनी या वाहिन्यांमध्ये प्रतिनीधी आणि वरिष्ठ प्रतिनिधी म्हणून काम पाहिले आहे, तसेच मुंबई सकाळ या वृत्तपत्रात मंत्रालय प्रतिनिधी म्हणून काम पाहिले आहे. त्याच प्रमाणे आयबीएन लोकमत या वृत्तवाहिनीत असोसिएट एडिटर म्हणून आणि मी मराठी या वृत्त वाहिनीत असोसिएट एडिटर म्हणून काम पाहिले आहे. तसेच त्यांनी युवर स्टोरी या डिजिटल मीडियात वरिष्ठ कंटेट प्रोड्युसर म्हणूनही काम पाहिले आहे. सुनील तांबे हे २०१५ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये आजतागायत कार्यरत आहेत. सुनील तांबे यांना इलेक्ट्रॉनिक, प्रिंट आणि डिजिटल मीडियात गेल्या २३ वर्षांपासून कार्यरत आहेत.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज