अ‍ॅपशहर

‘संघाचा हिंदुत्वाचा अजेंडा सेना राबवतेय’

‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हिंदुत्वाचा अजेंडा आता शिवसेना राबवत असून, भाजपपेक्षाही हिंदूराष्ट्राची भाषा‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हिंदुत्वाचा अजेंडा आता शिवसेना राबवत असून, भाजपपेक्षाही हिंदूराष्ट्राची भाषा अधिक आक्रमणपणे शिवसेनाच बोलत आहे,’अशी टीका रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांनी केली. अधिक आक्रमणपणे शिवसेनाच बोलत आहे,’ अशी टीका रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांनी केली. लोकवाङ्मय गृहातर्फे जयदेव डोळे लिखित ‘आरएसएस’ या पुस्तकाचे प्रकाशन पत्रकार निखिल वागळे यांच्या हस्ते झाले. या वेळी डॉ. बाबा आढाव बोलत होते.

Maharashtra Times 29 May 2017, 11:41 am
मटा ऑनलाइन वृत्त । पुणे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम shiv sena has implemented rss hindutva agenda
‘संघाचा हिंदुत्वाचा अजेंडा सेना राबवतेय’


‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हिंदुत्वाचा अजेंडा आता शिवसेना राबवत असून, भाजपपेक्षाही हिंदूराष्ट्राची भाषा अधिक आक्रमणपणे शिवसेनाच बोलत आहे,’ अशी टीका रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांनी केली.

लोकवाङ्मय गृहातर्फे जयदेव डोळे लिखित ‘आरएसएस’ या पुस्तकाचे प्रकाशन पत्रकार निखिल वागळे यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. बाबा आढाव बोलत होते. भालचंद्र कानगो, राष्ट्रसेवा दलाचे संजय गायकवाड, संयोजक लता भिसे उपस्थित होत्या.

आमचा आणि भाजपचा हिंदुत्त्वाचा अजेंडा एक समान असल्याचे शिवसेनेकडून सांगितले जात आहे. भाजपकडून इतका अपमान होऊनदेखील शिवसेना सत्तेत कायम आहे. संघामध्ये धोरणात्मक बदल होत असल्याचे सामान्य लोकांचे म्हणणे आहे, पण आम्ही बदलत नसून लोकांची आमच्याकडे पाहण्याची दृष्टी बदलत आहे, असे संघाचे म्हणणे असल्याचे आढाव यांनी सांगितले. समाजामध्ये विषमता वाढली असून त्याविरोधात आंदोलने सुरू आहेत. पंतप्रधान दुनियेतील दहशतवादासंबंधी बोलत आहेत, पण गल्लीतच दहशतवाद पोसला जातोय, अशी टीकाही आढाव यांनी केली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज