अ‍ॅपशहर

पुण्यातील बँकेत दागिने ठेवले आणि नंतर..; महिलेला आला धक्कादायक अनुभव

Pune Crime : कॉसमॉस बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेले तब्बल १६ तोळे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Authored byटीम मटा ऑनलाइन | Edited byअक्षय शितोळे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 Jun 2022, 10:03 am
पुणे : बँकेचे लॉकर हे मौल्यवान वस्तू सांभाळून ठेवण्यासाठीची सगळ्यात सुरक्षित जागा समजली जाते. मात्र पुण्यातील धनकवडी येथील शंकर महाराज मठाजवळील कॉसमॉस बँकेमधील लॉकरमधूनच सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे बँकेच्या लॉकरमध्ये बिघाड झाला असून तुमचे साहित्य घेऊन जा, असा बँकेकडून ग्राहकाला निरोप आल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bank locker
प्रातिनिधिक फोटो


धनकवडी येथील शंकर महाराज मठाजवळील कॉसमॉस बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेले तब्बल १६ तोळे सोन्याचे दागिने चोरीला गेले. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आशा चौधरी या महिलेने फिर्याद दिली असून दोन दिवसांपूर्वी हा प्रकार उघडकीस आला आहे.

'सर्व्हिस चार्ज'बाबत केंद्र सरकारचा दणका;रेस्टॉरंट-हॉटेलच्या मनमानी शुल्कावर अंकुश

नेमकं काय घडलं?

साधारण तीन महिन्यांपूर्वी आशा चौधरी यांनी कॉसमॉस बँकेच्या धनकवडी शाखेतील लॉकरमध्ये त्यांच्याजवळील दागिने ठेवले होते. तेव्हापासून दागिने लॉकरमध्येच होते. मात्र, बँकेच्या लॉकरमध्ये बिघाड झाला असून तुमचे साहित्य घेऊन जा असे दोन दिवसांपूर्वी बँकेकडून चौधरी यांना सांगण्यात आले. त्यानुसार चौधरी बँकेत गेल्या आणि लॉकरमधील साहित्य काढून घरी घेऊन आल्या. त्यावेळी १६ तोळे सोन्याचे दागिने नसल्याचे चौधरी यांच्या लक्षात येताच त्यांनी थेट पोलीस ठाणे गाठले.

दरम्यान, आशा चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सहकारनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर यांनी दिली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज