सायली दळवीचे यश मॅग्ना पब्लिकेशच्या 'सॅव्ही मॅगझिन'ने आयोजित केलेल्या मिसेस इंडिया २०१९ स्पर्धेमध्ये पुण्याच्या सायली दळवी हिने द्वितीय क्रमांक पटकाविला. या स्पर्धेत देशभरातील स्पर्धक सहभागी झाले होते. पारंपारिक वेशभुषा, प्रश्नोत्तरे अशा विविध पातळ्यांवर ही स्पर्धा झाली. यामध्ये दळवी हीने द्वितीय क्रमांकाचे यश मिळविले आहे. - समीर गुप्ते यांची निवड अखिल भारतीय चांद्रसेनीय कायस्थ प्रभू मध्यवर्ती संस्थाच्या अध्यक्षपदी समीर गुप्ते यांची निवड झाली आहे. उपाध्यक्षपदी अशोक देशपांडे, सुधाकर वैद्य, शिरीष चिटणीस, नागेश कुलकर्णी, सुधीर राजे, उपाध्यक्षपदी संजय दिघे, चंद्रशेखर देशपांडे, संजीव सुळे यांची, तर सभासदपदी आशिष गुप्ते, विराज गडकरी, मंदार कुलकर्णी यांची निवड झाली आहे. नुकत्याच झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये ही निवड करण्यात आली आहे.
थोडक्यात पट्टा--२...२५ जून
सायली दळवीचे यश मॅग्ना पब्लिकेशच्या 'सॅव्ही मॅगझिन'ने आयोजित केलेल्या मिसेस इंडिया २०१९ स्पर्धेमध्ये पुण्याच्या सायली दळवी हिने द्वितीय क्रमांक ...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Jun 2019, 4:00 am