अ‍ॅपशहर

नोटाबंदीचा निषेध आणि समर्थन

नोटबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त विविध संस्था संघटनांच्या वतीने शहरात नोटबंदीचा निषेध आणि समर्थनार्थ कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

Maharashtra Times 9 Nov 2017, 3:00 am
नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त शहरात विविध कार्यक्रम
महाराष्ट्र टाइम्स.कॉम social organisations protest against demonetisation in pune
नोटाबंदीचा निषेध आणि समर्थन


म. टा. प्रतिनिधी, पुणे
नोटबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त विविध संस्था संघटनांच्या वतीने शहरात नोटबंदीचा निषेध आणि समर्थनार्थ कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या नोटबंदीमुळे देशात अर्थक्रांती झाली असून भ्रष्टाचाऱ्यांचे कंबरडे मोडले आहे,’ असे महापौर मुक्ता टिळक यांनी बुधवारी नमूद केले. भारतीय जनता पक्षाच्या कसबा विधानसभा मतदारसंघाच्या वतीने नोटबंदीच्या समर्थनार्थ सह्यांची मोहिम राबविण्यात आली, त्या वेळी त्या बोलत होत्या. अनेक घोटाळ्यांची परंपरा असलेल्या काँग्रेसचे आता धाबे दणाणले असल्यामुळे जनआक्रोश आंदोलन सुरू झाल्याची टीका टिळक यांनी केली. या वेळी राजेश येपुरे, हेमंत रासने, गायत्री खडके, महेश लडकत, धीरज घाटे, योगेश समेळ, सरस्वती शेंडगे, प्रमोद कोंढरे, पुष्कर तुळजापूरकर आदी उपस्थित होते.

रिपब्लिकनचा ‘व्हाइट डे’
रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाच्या वतीने नोटबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त ‘व्हाइट डे’ साजरा करण्यात आला. उपमहापौर डॉ.सिद्धार्थ धेंडे, शहराध्यक्ष महेंद्र कांबळे, बाळासाहेब जानराव, सुनीता वाडेकर, हिमाली कांबळे, सोनाली लांडगे, श्याम सदाफुले, शशिकला वाघमारे आदी या वेळी उपस्थित होते.

भारिपतर्फे ‘लुटारू दिन’
भारिप बहुजन महासंघातर्फे नोटबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त ‘लुटारू दिन’ पाळत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. म. ना. कांबळे, किशोर कांबळे, सिद्धार्थ दिवे, बी. पी. सावळे, कमलेश उकरंडे आदी यामध्ये सहभागी झाले होते. दलित पँथरच्या वतीने मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. सुखदेव सोनवणे, प्रकाश साळवे, विठ्ठल केदारी, आरती बाराथे आदी या वेळी उपस्थित होते. रिपब्लिकन संघर्ष दलाच्या वतीने झालेल्या आंदोलनात संजय भिमाले, नितीन बालकी, विनायक बंडी, निलेश मडूर आदी यामध्ये सहभागी झाले. भीम आर्मीच्या वतीने नोटाबंदीचे प्रतिकात्मक वर्षश्राद्ध घालण्यात आले. दत्ता पोळ, सीताराम गंगावणे, प्रदीप कांबळे, गौतम कोटे या वेळी उपस्थित होते. रिपब्लिकन मातंग सेनेच्या वतीने अमोल तुजारे, वत्सला वाघमारे, विजय वडागळे आदींनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. हमारी अपनी पार्टीच्या वतीने आयोजित निदर्शनात राजेश अग्रवाल, पवनभाई गुप्ता, बाबासाहेब पाटील सहभागी झाले होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज